नाशिक : मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड घाटात एसटी-ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 22 जण जखमी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. अपघातामुळे मुबंई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत सुरू केली आहे. बस जळगाव येथून नाशिककडे जात असताना ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण आहे की, एसटीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली आहे. त्यामुळे एका बाजूला बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे