महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेची 'मत'पेरणी? राज्य सरकारकडून पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी मोफत तीर्थयात्रा! - Maharashtra Government schemes News - MAHARASHTRA GOVERNMENT SCHEMES NEWS

Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून 'मत'पेरणीला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय. राज्य सरकारकडून आता वारकऱ्यांसाठी तसंच सर्वधर्मीय ज्येष्ठांसाठी खास योजनेची घोषणा करण्यात आलीय.

Maharashtra Assembly Elections 2024 mukhyamantri warkari sampradaya mahamandal and mukhyamantri tirtha darshan yojana know more about it
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची 'मत'पेरणी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 10:40 AM IST

मुंबई Mukhyamantri Tirtha Darshan Yojana : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. नुकतीच राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना लागू करण्यात आली आहे. यात पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्यात.

'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना : राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आलीय. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं मुख्यालय पंढरपुरात असेल. तसंच या महामंडळावर कार्यरत अथवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी शासनाकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आलीय. तसंच या महामंडळाच्या माध्यमातून परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर रविवारी (14 जुलै) राज्य सरकारकडून यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील सर्वधर्मीयांमधील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा घडवणारी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा शासन निर्णय रविवारी (14 जुलै) जारी करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठांना देशातील तीर्थक्षेत्रांचं मोफत दर्शन देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. या तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ लेणी, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमधील धार्मिक स्थळं तसंच बौद्ध आणि जैन धर्मीय स्थळही यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रात, मुंबईतील 15 धार्मिक स्थळं या योजनेचा भाग आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, विपश्यना केंद्र पॅगोडा, एक सभास्थान, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी यांचा समावेश असेल.

हेही वाचा -

  1. माऊलीच्या चरणी सेवा योग; पंढरपूर वारीत सह्याद्री मानव सेवा मंचाकडून 40 वर्षे केली जात आहे सेवा - Pandharpur Wari
  2. हैदराबादचे अब्दुल चाचा करतात वारकऱ्यांची सेवा, 25 वर्षांपासून सेवा देण्यात त्यांना मिळतोय आनंद - Ashadhi wari 2024
  3. वारकऱ्यांची मेट्रो वारी ! पिंपरी मेट्रोत 'जय जय राम कृष्ण हरी'चा जयघोष - Pimpri Metro Travel

ABOUT THE AUTHOR

...view details