महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेत १ कोटी ९६ लाख महिलांना मिळाला तिसरा हप्ता, इतर लाभार्थ्यांना कधी ? - Ladki bahin yojana - LADKI BAHIN YOJANA

Ladki Bahin Scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर चिंता करू नका. कारण, लाभार्थी महिलांना पैसे हस्तांतरण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी सायंकाळी एक्स मीडयावर पोस्ट केली.

Mukhyamantri Ladki bahin scheme
लाडकी बहीण योजना (Courtesy - Meta AI/ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 9:17 AM IST

Updated : Oct 3, 2024, 10:23 AM IST

मुंबईLadki Bahin Scheme-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. योजनेतून ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरणाऱ्या 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 बहिणींना तिसऱ्या टप्प्याचे पैसे त्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. उर्वरित बहिणींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच सर्व पात्र बहिणींना लाभ मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत. मात्र त्यांचे अर्ज काही तांत्रिक अडचणींमळं पात्र ठरले नाहीत. त्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर केल्यानंतर योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. काही महिलांना बँक खाते आधार कार्डासोबत जोडलेले नसल्यानं योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळं त्या महिलांना बॅंक खाते आधार कार्डासोबत जोडल्यावर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 29 सप्टेंबरला दिली आहे.

आजपर्यंत लाडकी बहीण योजनेबाबत काय आहे अपडेट?

  • लाडकी बहीण योजनेला आजपर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 31 जुलै होती. त्यानंतर ही मुदत वाढवून 31 ऑगस्ट, 30 सप्टेंबर केली आहे. आता पुन्हा योजनेला मुदतवाढ मिळणार की नाही? याबाबत राज्य सरकारकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र उमेदवारांचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे असे 3 हजार रुपये 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात दिली.
  • राज्यातील महिलांनी सरकारला साथ दिल्यास ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत आर्थिक मदत 3,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कोल्हापूरमधील कार्यक्रमात सांगितले.
  • राज्य सरकारनं ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. असे असले तरी जुलै महिन्यासाठीदेखील पात्र महिलांना लाभ देण्यात आला. ऑगस्टमध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्टसाठी तीन हजार रुपये असा पहिला मिळाला.

तिजोरीवर सुमारे 46 हजार कोटींचा भार-लाडक्या बहीण योजनेकरिता राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तरदूत करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 46 हजार कोटींचा भार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मध्य प्रदेशमधील 'लाडली बहना योजने'च्या धर्तीवर राज्यात ही योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी आणि प्रचार महायुती सरकारकडून जोरदार सुरू आहे.

हेही वाचा-

  1. आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 'लाडकी बहीण योजने'चे पैसे 'या' तारखेला मिळणार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
  2. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारची कठोर पावलं; अदिती तटकरे म्हणाल्या, "सावत्र भावावर कारवाई..." - Missused of Ladki Bahin Yojana
  3. आनंदाची बातमी!,'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; कुणाला 4500 तर कुणाला 1500 रुपये - Ladki Bahin Yojana
Last Updated : Oct 3, 2024, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details