महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, पेंटर कामगाराचा मुलगा झाला 'क्लास वन अधिकारी', गावात जंगी स्वागत - MPSC Success Story - MPSC SUCCESS STORY

MPSC Success Story : प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो. अहमदनगर येथील शिवा शेळके या तरुणानं ते करुन दाखवलंय. अतिशय गरीब कुटुंबातला हा तरुण आपल्या यशामुळं चर्चेत आलाय.

MPSC Success Story
सलग तिसर्‍यांदा एमपीएससी परिक्षेत बाजी (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 8:18 PM IST

अहमदनगर MPSC Success Story :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीची परीक्षा पास होण्याचं अनेक तरुण, तरुणींचं स्वप्न असतं. अनुकूल परिस्थितीत काही जण यश मिळतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालणारे कमीच असतात. अकोले तालुक्यातील कोतुळ येथील शिवा शेळके या तरूणानं 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'च्या परीक्षेत सलग तीन वेळा बाजी मारलीय. 2023 च्या निकालात त्यानं 47वा क्रमांक पटकावलाय. बिकट परिस्थितीवर मात करून ध्येय गाठणाऱ्या शिवाची ग्रामस्थांनी गावात मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.

अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर यश :आई विडी कामगार आणि वडील पेंटर अशा गरीब परिस्थितीत शिवानं एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा स्वतःला सिद्ध केलं. 2022 मध्ये, 105 क्रमांक मिळवून त्यांची राज्य विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली. 2023 मध्ये 47 वा क्रमांक पटकावणारा शिवा आता वरिष्ठ पदावर रुजू होणार आहे. तिन्ही बहीणी आणि आई- वडीलांच्या कष्टाचं चीज करत शिवानं अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर एवढं मोठं ध्येय गाठल्यानं त्याच गावात कौतूक होतंय.

अकोले तालुक्यातील कोतुळेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत शिवा प्रथम आला होता. अकरावी आणि बारावीचं शिक्षण त्यानं संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात घेतलं. बारावीतही तो प्रथम आला. त्यांनंतर नाशिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगलाही त्यानं प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या अभ्यासातील प्रगतीमुळं त्यानं पुणे येथे 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'च्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत त्याला काही गुणांनी यश मिळू शकलं नाही. मात्र, त्यानं आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही.

गरीबीवर मात करत मिळवलं यश :घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई विडी कामगार तर वडील पेंटर काम करून घर सांभाळायचे. परिस्थितीची जाणीव असलेल्या शिवानं परीक्षेत यश मिळवण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करायला सुरूवात केली. तब्बल सहा वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर त्याला आशेचा किरण सापडला. त्याची क्लास टू मधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाली. 2022 मध्ये त्याची राज्य विक्रीकर आयुक्तपदी निवड झाली. त्यानंतरही तो त्यानंतर तो परीक्षा देत राहिला. नुकत्याच जाहीर झालेल्या 2023 च्या निकालात तो क्लास वन अधिकारी झाला. 2022 च्या निकालात तो 105 व्या क्रमांकावर राहिला होता. तर 2023 च्या निकालात तो 47व्या क्रमांकावर आला. त्यामुळं आता एका वरिष्ठ अशा उच्चपदावर शिवाची नियुक्ती होणार आहे.

हेही वाचा

  1. मुलगा अभियंता होण्यासाठी आई-वडिलांनी गहाण ठेवलं शेत; आज 'त्याची' व्यवसायात 60 कोटी रुपयांची उलाढाल, 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट - Nilesh Sabe Success Story
  2. कोल्हापुरातील भावंडांची कमाल; 'नामधारी काकडी'च्या शेतीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न - Cucumber Farming Success Story
  3. कोल्हापूरच्या लेकीचा युपीएससीत झेंडा; जिल्हाधिकारी पदाला घातली गवसणी - UPSC Success Story

ABOUT THE AUTHOR

...view details