महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

MP Udayanraje Bhosale : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. मात्र या जागेवर अजित पवार गट उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहे. तरीसुद्धा साताऱ्याची जागा कधीतरी जाहीर करावीच लागणार, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

MP Udayanraje Bhosale
खासदार उदयनराजे भोसले

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 5:06 PM IST

खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

पुणेMP Udayanraje Bhosale : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुती कडून खासदार उदयनराजे भोसले हे इच्छुक असल्याचं सांगितलं जातं आहे. तर महायुतीत ही जागा अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. साताऱ्याच्या जागेच्या संदर्भात उदयनराजे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "साताऱ्याची जागा कधीतरी जाहीर करावीच लागणार आहे."

संभाजी राजेंनी सर्वधर्मसमभावाची संकल्पना पुढे नेली :छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या निमित्तानं छत्रपती उदयनराजे यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उदयनराजे म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराज शूरता, शौर्य याचं प्रतीक होते. मरण पत्करलं, पण शरण कधी गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांना लाभला आणि जगाव कसं आणि तत्त्व कशाला म्हणतात, असे बरेच पैलू आपल्याला शिकायला मिळतात. सर्वधर्म समभावाची जी काय संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली. आज शूरता, वीरता यांची आठवण येते. या ठिकाणी स्मारक आहे त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि शासनाने अधिकृतरीत्या इतिहास वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित करावा. तसेच सगळीकडे इतिहास पोहोचला पाहिजे आणि तरुण पिढीला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आज सगळ्यांच्यावतीनं महाराजांना पुण्यतिथी निमित्तानं मानाचा मुजरा अर्पण करतो.


कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न :आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पत्रकारांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत उदयनराजे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "माझा लोकसंपर्क आहे. मला वेळ पण मिळत नाही. मी वेषांतर करत नाही आणि बोलायला टाळत नाही. माझ्या वाचण्यात काही आलं नाही. शेवटी सगळ्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

राज्यातील पाणीप्रश्न गंभीर :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत उदयनराजे म्हणाले की, "प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आरोप होत राहतील. पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. धरणांची पातळी खालावली आहे. पावसाची इतक्यात चिन्हं दिसत नाहीत. पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. पाणी अभावी कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही पाहिजे. जनावरांची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाची जशी काळजी घेतात तशी जनावरांची काळजी घेतली पाहिजे, असं यावेळी उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा:

  1. 'स्वराज्यधर्मा'साठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल जाणून घ्या... - Sambhaji Maharaj Punyatithi
  2. लोकसभेच्या रणधुमाळीत कर्नाटकात एका घरातून 7 कोटी रुपयांसह दागिने जप्त, पोलिसांकडून चौकशी सुरू - crores cash jewellery seized
  3. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam

ABOUT THE AUTHOR

...view details