महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीसह सुनेच्याही नावावर मद्य परवाने, मंत्री असताना केला पदाचा गैरवापर? शिंदेंच्या खासदारावर गंभीर आरोप - Sandipan Bhumre - SANDIPAN BHUMRE

Sandipan Bhumre : खासदार संदीपान भुमरे यांनी रोजगार हमी तसंच फलोत्पादन मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून पत्नी, सुनेच्या नावे पाच वाईन शॉप खरेदी केल्याचा आरोप ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे.

Dutta Gorde
दत्ता गोर्डे (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 11:07 PM IST

छत्रपती संभाजीनगर Sandipan Bhumre : खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केलाय. मंत्री पदावर असताना भुमरेंनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 5 वाईन शॉप खरेदी केल्याचं त्यांचं म्हणणे आहे. संविधानानं दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी, असं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याची माहिती गोर्डे यांनी दिली. माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली असून आणखी मद्य परवाने भुमरे कुटुंबियांच्या नावे निघतील, असा दावा यावेळी करण्यात आलाय. यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा दावा करत खासदार संदिपान भुमरे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय. तसंच त्यांनी राज्याचे लोकायुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलंय.

दत्ता गोर्डे यांची पत्रकार परिषद (Etv Bharat Reporter)

भुमरे यांच्यावर आरोप :खासदार संदीपान भुमरे यांच्यावर निवडणूक काळात त्यांच्या व्यवसायाबाबत विरोधकांनी टीका केली होती. दारूचा व्यवसाय असल्यानं त्यांच्यावर निशाना साधला होता. मात्र, याच व्यवसायाबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं तक्रार देण्यात आलीय. 2024 तसंच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथ पत्रात भुमरे यांनी दारू व्यवसायाबाबत दिलेल्या माहितीत तफावत आहे. एक दोन नाही, तर राज्यात जवळपास 5 वाईन शॉप परवानं त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. भुमरे यांची पत्नी, सुनेच्या नावावर राज्यात 5 परवाने आहेत. हे परवाने ते मंत्री असताना घेण्यात आले आहेत. मंत्री म्हणून पदावर असताना असे परवाने नियमानं घेता येत नाहीत. त्यामुळे गैरप्रकारानं परवाने मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप दत्ता गोर्डे यांनी केलाय.

उत्पन्न कमी असताना मोठी गुंतवणूक कशी :नियमानं वाइन शॉप परवाना नामांतर करायचा असेल, तर एक कोटी रुपयांचं शुल्क आकारलं जातं. संदीपान भुमरे तसंच त्यांच्या पत्नीचं उत्पन्न दोन कोटी दाखवण्यात आलंय. त्यामुळं त्यांनी पाच कोटींची गुंतवणूक केली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्यांचा मुलगा विलास भुमरे यांचं उत्पन्न पन्नास लाख असताना त्यांच्या पत्नीच्या नावावर देखील वाईन शॉप घेण्यासाठी मोठी गुंतवणूक कशी केली. विलास भुमारे यांची पत्नी शिक्षक आहे. त्यांनी शिक्षक असताना दारू दुकानाचा परवाना घेतलाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं भूमरेंची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील सर्वच जिल्ह्यात भूमरे यांच्या कुटुंबियांच्या नावावर किती दारू परवाने आहेत, याची माहिती मागवली असून त्यात मोठे खुलासे होतील, असा दावा दत्ता गोर्डे यांनी केलाय.

हे वाचलंत का :

  1. उद्धव ठाकरेंनी दाखवली मानसिक दिवाळखोरी; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका - Chandrasekhar Bawankule
  2. "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
  3. भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार : ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका - BJP criticizes Uddhav Thackeray

ABOUT THE AUTHOR

...view details