महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभेत नंदीबैल पाठवायचा की वाघ पाठवायचा हे जनता ठरवणार- खासदार अमोल कोल्हे

MP Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. याविषयी डॉ. अमोल कोल्हे यांना आज (1 मार्च) विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

MP Amol Kolhe
खासदार अमोल कोल्हे

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 9:06 PM IST

डॉ. अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

पुणेMP Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोण उमेदवार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगली आहे. एकूणच आगामी लोकसभा तसेच शिरूर लोकसभाबाबत खासदार अमोल कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''यंदा लोकसभेत नंदी बैल पाठवायचा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे जनता ठरवणार आहे.''

डॉ. अमोल कोल्हे पुन्हा उतरणार निवडणूक रिंगणात:पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रिंगणात असणार आहेत. कोल्हे यांच्यासाठी शरद पवार रिंगणात उतरले आहेत. शिरूर लोकसभेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जवळपास 5 ते 6 तास पवार यांनी बैठक घेतली. आजच्या बैठकीबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, " बारामती लोकसभा मतदार संघातील 3 विधानसभा मतदार संघाचा साहेबांनी आढावा घेतला. खेड आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर या तिन्ही मतदार संघाचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याचं म्हणणं साहेबांनी ऐकलं. कार्यकर्ते हे ग्राउंडवर काम करत असतात. त्यांचं म्हणणं आज ऐकून घेण्यात आलं आहे."

ही आमच्या कामाचा पोचपावती:शिरूरमधून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपाकडूनदेखील निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "समोर कुणीतरी येणार हे स्पष्ट आहे. महायुतीकडे 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री असतानादेखील उमेदवार फायनल होत नाही. ही माझ्या कामाची पोचपावती आहे, असं मी मानतो, असं यावेळी खासदार कोल्हे म्हणाले.

उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचं स्वागत करील:उद्या वडू बुद्रुक येथील कार्यक्रमासाठी अमोल कोल्हे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, " अजून तरी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकांचा भूमिपूजन सोहळा आहे. त्या कार्यक्रमासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येत आहेत. त्यांचं मी मनापासून शंभूभक्त म्हणून स्वागत करतो," असं यावेळी कोल्हे म्हणाले.



यामुळे मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नाकारलं:शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. पण मुख्यमंत्री यांनी पूर्वनियोजित दौरा असल्याचं सांगत अजित पवार यांचं निमंत्रण नाकारलं आहे. याबाबत कोल्हे यांना विचारलं असता ते म्हणाले की, पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मुख्यमंत्री येणार नसावेत. साहेबांनी निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारलं असतं तर सुसंस्कृत राजकारणाविषयी मुख्यमंत्री आस्था बाळगून आहेत, असं चित्र निर्माण झालं असतं. पण त्यांचं खरोखर पूर्वनियोजित कार्यक्रम असेल म्हणून ते येत नसावेत, असं यावेळी कोल्हे म्हणाले.

महायुतीनं उमेदवाराबाबत आत्मपरीक्षण करणं गरजेचं :कोल्हे यांच्या विरोधातील उमेदवाराबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ''आधी उमेदवार फायनल होऊ द्या. आधीच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको. यंदाची ही लोकसभेची निवडणूक दिल्लीतून आदेश आल्यावर नंदीबैलासारखे माना डुलवणारे लोकप्रतिनिधी पाठवायचे आहेत की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे आहेत, हे ठरवणारी आहे. तसेच महायुतीनं उमेदवाराबाबत आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. राज्यातून अनेक उद्योग उद्योगधंदे आणि रोजगार गेले आहेत. शेतकरी हैराण आहेत. महायुती सरकारनं कुठलीही भूमिका घेतली नाही. हे जनतेनं पाहिलं आहे. म्हणून यांच्यावर ही वेळ आली आहे.''

हेही वाचा:

  1. भुसे-थोरवे यांच्यात धक्काबुक्की नाही हो, चर्चेत 'आवाज थोडासा वाढला' एवढंच...; शंभूराज देसाई यांचा खुलासा
  2. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण! शरद पवार यांच्या 'लंच डिप्लोमसी'मध्ये दडलंय काय?
  3. फोनवर अन् पत्राद्वारेही शरद पवार यांचं निमंत्रण! मात्र, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नाकारलं

ABOUT THE AUTHOR

...view details