पुणे Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील पोलिसांनी अटक केलीय. शिवानी अगरवाल यांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केली असून मुलाच्या नमुन्यांऐवजी स्वतःचे नमुने सादर केल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय. तर आज शिवानी अगरवाल (Shivani Agarwal) आणि विशाल अगरवाल (Vishal Agarwal) या दोघांनाही न्यायालयानं 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ते रक्ताचे नमुने आईचेचं : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात रक्ताच्या नमुन्यांची फेरफार करण्यात आली होती. कोणाच्या रक्ताचे नमुने ससूनमध्ये देण्यात आले आहेत याबाबत चर्चा सुरू असताना, पोलिसांच्या तपासात त्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुण्याऐवजी आईंचेच रक्त देण्यात आले असल्याचं सिद्ध झालंय.
आरोपींचे डीएनए सँपल घ्यायचं आहे: आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत चौकशी अधिकारी यांनी न्यायालयात माहिती दिली की, साक्षीदार एफएसएल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले आहे. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. तसेच विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल या दोन्ही आरोपींचे डीएनए सँपल घ्यायचं आहे. तसेच ३ लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा देखील तपास करायचा आहे. मूळ रक्ताचे नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. तसेच विशाल आणि शिवानी अगरवाल यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे.