महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Gandhi : तरुणांना बेरोजगार ठेऊन मोदी सरकारने देशाची संपत्ती उद्योगपतींच्या घशात घातली - राहुल गांधी - Bharat Jodo Nyaya Yatra

Bharat Jodo Nyaya Yatra : मुठभर उद्योगपतींचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज माफ करणारे भाजपा सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर (Modi govt) सडकून टीका केली. गांधी आज बुधवार (दि. 13 मार्च) रोजी धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित नागरिकांशी बोलत होते.

Rahul Gandhi
राहुल गांधी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 3:12 PM IST

Updated : Mar 13, 2024, 5:50 PM IST

राहुल गांधी

धुळे :Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात पोहोचली. यादरम्यान धुळे शहरातील आग्रा रोडवरून (Rahul Gandhi) राहुल गांधी यांचा भव्य रोड शो झाला. त्यानंतर त्यांनी येथील शिवाजी महाराज चौकात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी गांधी यांनी 'देशातील केवळ 22 उद्योगपतींच्या हातात 90 टक्के संपत्ती आहे. तर, 90 टक्के दलित, आदिवासी, मुस्लिम मागासवर्गीय यांच्या हातात केवळ तीन टक्केसुद्धा संपत्ती नाही असा दावा करत देशाची संपूर्ण संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचं मोदी सरकारचं (Modi govt) धोरण आहे असा घणाघात त्यांनी सध्याच्या मोदी सरकारवर यावेळी केला. तसंच, महागाई आणि बेरोजगारीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

केवळ 90 लोक सरकार चालवतात : देशात 22 असे लोक आहेत, ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच 70 कोटी लोकांकडे आहे. 24 वर्षासाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागतं. मोदी सरकारने 16 लाख करोड रुपये 22 उद्योगपतींना दिली आहे म्हणजे जितकं मनरेगाचं 24 वर्षासाठीचं बजेट आहे असा थेट गंभीर आरोप राहुल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी महिलांसठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये मोदींनी मोठ्या धूम धडाक्यात महिला आरक्षण दिलं. फटाके फोडले नाचले आणि सांगितलं गेलं की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देण्यात येणार. मात्र, ते दिलं गेलं नाही. परंतु, काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण दिलं जाणार असं आश्वासन राहुर गांधींनी यावेली दिलं आहे.

जनगणना महत्त्वाची : देशात 50 टक्के मागास लोक आहेत. पण याचा अंदाज कुणालाच नाही. यामध्ये 15 टक्के दलित आहेत. 15 टक्के अल्पसंख्याक आहेत. तर 8 टक्के आदिवासी आहेत. केवळ 90 लोक सरकार चालवतात. ते आयएएस लोक आहेत. कुणाला किती बजेट मिळणार हे ठरवतात. यात दलित केवळ 3 जण आहेत. एकही आदिवासी नाही. दलित 15 टक्के आहेत. मात्र, देशाच्या बजेटमध्ये त्यांची हिस्सेदारी केवळ 1 टक्का आहे असा दावा करत जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत लोकांचा विकास होणार नाही असा विश्वास राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार : कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही राहुल गांधींनी यावेळी केली आहे. सरकारी नोकरीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. तसंच, आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार आहे असंही गांधी यावेळी म्हणालेत.

Last Updated : Mar 13, 2024, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details