पुणेShahjibapu Patil : "शरद पवार हे शरद पवार आहेत, मात्र कधी-कधी गुरुला चेला भारी पडतो," अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. तुम्ही शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्यानं सांगोला विधानसभा मतदार संघातील नागरिक तुमच्यावर नाराज आहेत? तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न आमदार शहाजी बापू पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर शाहाजी बापू म्हणाले, "माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल. तसंच मोहिते पाटील यांचा उमेदवार कोणीही असो, मी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पाठींबा देईल," असं त्यांनी सांगितलंय.
40 हजार मतांनी निवडून येईन :"मतदार संघात माझ्यावर कोणी नाराज नाही. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे. हे आतापर्यंतच्या निवडणुकीत दिसून आलं आहे. मी पाच वेळा पराभूत झालो, तसंच दोन वेळा निवडून आलो. आगामी निवडणुकीत मी किमान 40 हजार मतांनी निवडून येईन. मला यात कोणताही शंका, अहंकार नाही. मात्र, मी मतदार संघात कामं केली आहेत. त्या बळावर मी निवडून येईन," अशी भूमिका शहाजीबापू पाटील यांनी मांडली.