महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशांची किंमत नाही का? गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहेर - Ganesh Naik On Cidco

Ganesh Naik On Cidco : सिडको, (Cidco) एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला मैदान, उद्याने, शाळा, रुग्णालये आदी नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत, या प्रकरणावरून भाजपा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) संतप्त झाले आहेत. आज विधानसभेमध्ये त्यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 5:30 PM IST

Ganesh Naik
गणेश नाईक (Etv Bharat File Photo)

मुंबई Ganesh Naik On Cidco :सिडको (Cidco) आणि राज्य सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत, अशा शब्दांत भाजपाचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी विधानसभेत सरकारला घरचा आहेर दिलाय." मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशांची किंमत नाही का? तसे असेल तर सांगा. आम्ही लोकांमध्ये गेल्यावर त्यांना हेच सांगू", असा प्रश्न उपस्थित करत आमदार नाईक यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय.

मुख्यमंत्र्यांना किंमत नाही का ? : 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्त्वात आली. पहिली निवडणूक 1995 मध्ये झाली. गेल्या 30 वर्षांत सिडको, एमआयडीसीकडून नवी मुंबई, उद्यानं, शाळा, रुग्णालयं, यासारख्या नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं पाठपुरावा केल्यानंतर 1 जून 2023 रोजी त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसीचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्र बसून प्रश्न सोडवावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. पण 13 महिने उलटूनही काहीच झाले नाही, अशी टीका करताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशांची किंमत नाही का, असा सवाल आमदार गणेश नाईक यांनी विचारला आहे.

प्रशासनावर केले आरोप : विधानसभेत आमदार गणेश नाईक यांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या जीवन मरणाची गंभीरतेने दखल न घेता, त्याच्याशी खेळ सुरु आहे. म्हणून माझा असा आरोप आहे की, राज्य शासनात देखील सर्वांचे हाथ स्वच्छ आहेत असे नाही. अस म्हणत त्यांनी थेट राज्य सरकार आणि प्रशासनावर आरोप केले आहेत.

हेही वाचा -

  1. 10 वर्ष झाली अजून 20 बाकी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधी पक्षनेत्यांचा 'वॉकआऊट' - PM Modi Slams Opposition
  2. हिंदूंवर खोटे आरोप करण्याचं कारस्थान : पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका - Parliament Session
  3. विधिमंडळ समित्या का रखडल्या ; राजकीय पक्ष आहेत का जबाबदार ?, जाणून घ्या सविस्तर - Maharashtra Legislative Committees

ABOUT THE AUTHOR

...view details