महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरमध्ये चौका-चौकात बसवलं 'मिस्ट टाईप फाउंटन', हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न - Mist type fountain in Kolhapur

कोल्हापूरमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या निधीमधून शहरातील मध्यवर्ती चौकात दाभोळकर कॉर्नरला हा उपक्रम राबवला जात आहे.

कोल्हापुरमध्ये चौका-चौकात बसवलं 'मिस्ट टाईप फाउंटन
कोल्हापुरमध्ये चौका-चौकात बसवलं 'मिस्ट टाईप फाउंटन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 11:24 AM IST

Updated : Feb 13, 2024, 12:13 PM IST

कोल्हापुरमध्ये चौका-चौकात बसवलं 'मिस्ट टाईप फाउंटन

कोल्हापूर :कोल्हापुरातील हवा प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या निधीमधून शहरातील मध्यवर्ती चौकात दाभोळकर कॉर्नरला हा उपक्रम राबवला. येथील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर मशीन बसवण्यात आली आहे. तर, अशाच पद्धतीने हवा प्रदूषण नियंत्रणासाठी शहरातील काही मुख्य चौकात मिस्ट टाईप फाउंटन बसवण्यात आले आहेत. यामुळे नक्कीच कोल्हापुरातील हवा प्रदूषणात घट होण्यास मदत होईल असं बोललं जातंय.

धूळ कणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार : मिस्ट टाईप फाउंटन साधारण पंधरा फूट उंचीचे असून, त्यांतून पाण्याचे फवारे हवेत सोडले जाणार आहेत. त्यामुळे हवेतील धूळ पाण्याच्या दवबिंदूंप्रमाणे बारीक थेंबांबरोबर खाली येतील. त्यामुळे हवेतील धूळ कणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिली आहे.

असं आहे या मिस्ट टाईप फाउंटननियोजन :सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर या मिस्ट टाईप फाउंटनमधून पाण्याचे फवारे मारले जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या पंपांच्या जवळून पाण्याच्या पाईपलाईनलाच हे पंप जोडले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या पंपांमधून फवारा करण्यासाठी पिण्याचे पाण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध केलेले पाणी वापरले जाणार आहे. तर, या फाऊंटनमधून लगेच ठराविक वेळाने काही सेकांदासाठी पाण्याचे फवारे उडवले जाणार आहेत.

फाऊंटन साधारण पंधरा फूट उंचीचे : यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात येत असलेले हे मिस्ट टाईप फाउंटन कोल्हापूरकर कितपत स्वीकार करणार, त्याचबरोबर फक्त चौका चौकात बसवण्यात येणाऱ्या या फाऊंटनमुळे प्रदूषणात किती प्रमाणात घट येणार, हे पाहावे लागणार आहे. हे फाऊंटन साधारण पंधरा फूट उंचीचे असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा केला जाणार आहे. त्यामुळे आता हे कोल्हापूरकर कसं घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Last Updated : Feb 13, 2024, 12:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details