अमरावतीOrdeal Of Minor Girl :गुप्तधन मिळावे यासाठी आईकडून गत तीन वर्षांपासून एका मांत्रिकाच्या माध्यमातून आपला छळ केला जातो आहे असं सांगणारी पंधरा वर्षीय युवती वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातून रविवारी थेट अमरावतीत पोहोचली. यानंतर तिने समाजसेवी प्रीती साहू यांना मोबाईलवरून संपर्क साधून आपली सारी व्यथा सांगितली. त्यानंतर तिला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले.
गुप्तधनासाठी अघोरी प्रकार :युवतीची आई अंधश्रद्धाळू असल्यामुळे एका मांत्रिकाद्वारे आपल्या मुलीवर ती अघोरी विद्या करून गुप्तधन मिळेल या आशेने तीन वर्षांपासून युवतीला घरात रोज रिंगण करून भोंदू तांत्रिकाच्या माध्यमातून तिच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग करत होती. या अघोरी कृत्या दरम्यान तिला उपाशी ठेवले जायचे. हा सारा प्रकार असह्य झाल्यामुळे मी घर सोडून अमरावतीला पळून आले असे त्या युवतीने मला सांगितले असल्याची माहिती प्रीती साहू यांनी दिली. रविवारी अचानक त्या युवतीचा मला कॉल आला. तिला भेटायला मी मध्यवर्ती बस स्थानक येथे गेली. त्या मुलीला भेटल्यावर आणि तिची कहाणी ऐकल्यावर मला मोठा धक्काच बसला असे प्रीती साहू यांनी सांगितले.