सिंधुदुर्ग-रत्नागिरी :Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha :सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांची समन्वयी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मात्र, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी उदय सामंत यांचं नाव पुढे आल्यास काय होऊ शकतं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निवडणूक लढवावी की लढवू नये हा उद्योग मंत्री उदय सामंतांचा प्रश्न आहे. तर, यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे केंद्रामध्ये मंत्री आहेत. त्यांचाही सन्मान झाला पाहिजे असं उत्तर शालेय केसरकर यांनी दिलं. तर किरण सामंत हे तरुण तडफदार नेतृत्व आहेत असंही केसरकर यावेळी म्हणाले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा : यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेला मिळाली तरी आमचा महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर आपला दावा माध्यमांसमोर जाहीर केला. यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारणा केली असता केसरकर यांनी हे माझे प्रश्न नाहीत. ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा असं उत्तर माध्यम प्रतिनिधींना दिलं.
नारायण राणे यांचे सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध :आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची समन्वय समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजेरी न लावता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर ते निघून गेले. याबाबत मंत्री दीपक केसरकर यांना विचारलं असता केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला कसे समजणार असं उत्तर देत या प्रश्नावर बोलणं टाळलं.