मुंबई MGL Reduced CNG Price : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई तसंच आजुबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात करण्यात आलीय. सध्या जनता महागाईनं हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय. अशा परिस्थितीत सीएनजीच्या दरात झालेली कपात ही जनतेसाठी दिलासा देणारी बाब आहे. सार्वजनिक क्षेत्रातील महानगर गॅसनं (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांची कपात केलीय.
सीएनजीच्या दरात कपात : मंगळवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात कंपनीनं म्हटलंय की, गॅसच्या उत्पादन खर्चात कपात केल्यामुळं याच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. गॅसचा उत्पादन खर्च कमी झाल्याचं कंपनीनं म्हटलंय. याच कारणामुळं सीएनजीच्या दरात कपात करण्यात आलीय. ही कपात 5 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू झालीय. गॅसच्या उत्पादन खर्चात कपात झाल्यामुळं येत्या काही दिवसांत देशाच्या इतर भागांमध्येही सीएनजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
MGL करते मुंबईला गॅस पुरवठा : सरकारी कंपनी महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीच्या दरात प्रति किलो 2.5 रुपयांनी कपात केल्यानंतर सीएनजीची किंमत 73.50 रुपये प्रति किलो झालीय. MGL मुख्यत्वे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅसचा पुरवठा आणि विक्री करते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीएनजीच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र सध्या देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीत सध्या सीएनजीची किंमत 76.59 रुपये प्रति किलो आहे.
- सीएनजीमुळं बचत :MGL नं असंही म्हटलंय की, मुंबईतील सध्याच्या किंमतीच्या पातळीवर, पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 53 टक्के आणि डिझेल 22 टक्के बचत करते. या कपातीनंतर वाहतूक क्षेत्रात सीएनजीचा वापर वाढेल. त्यामुळे देशात पर्यावरणाला संवर्धनाला मदत होईल, अशी आशाही कंपनीनं व्यक्त केलीय.
हेही वाचा :
- Big changes in november 2023 : आजपासून होत आहेत मोठे बदल; जाणून घ्या काय होईल परिणाम
- एलपीजी सिलिंडर ते वाहन खरेदी करताना खिशावर काय होणार परिणाम? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 'हे' होणार बदल