महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोरिवली-भाईंदरदरम्यान आज मेगाब्लॉक, वाचा आजचं रेल्वेचं वेळापत्रक - mega block today mumbai

रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेतील ट्रॅक दुरुस्ती तसंच तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेकडून आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर दरम्यान अप-डाऊन एक्स्प्रेस मार्गावर रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

Mega Block between Borivali-Bhayandar
Mega Block between Borivali-Bhayandar

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 8:19 AM IST

मुंबई :पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी दुरुस्तीच्या कामामुळं बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान चार तास रात्रीचा मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी 4.00 तासांचा जंबो ब्लॉक अप फास्ट मार्गावर 23.30 ते 03.30 तास आणि डाऊन मार्गावर 00.40 ते 04.40 तासांपर्यंत ब्लॉक घेतला जाईल.

उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक नसणार : पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील गाड्या विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळं रविवार, 10 मार्च 2024 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही.

'ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील गाड्या विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळं रविवार, 10 मार्च 2024 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक असणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडं उपलब्ध असेल'.-सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वे

बुलेट ट्रेन कॉरिडॉरचं बांधकाम सुरू :पश्चिम रेल्वेनं सांगितलं की, महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये एलिव्हेटेड सेक्शनमध्ये बुलेट ट्रेन कॉरिडॉरचं बांधकाम सुरू झाले आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, पश्चिम रेल्वेनं सांगितलं की हा विभाग मुंबईजवळील शिळफाटा ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत एकूण 135 किमी लांबीचा आहे. प्रकल्पाच्या बांधकामात 6 डोंगरी बोगदे, 36 क्रॉसिंग (त्यातील 11 पोलादी पूल) उल्हास, वैतरणा, जगनी नद्यांसारख्या प्रमुख जलसाठ्यांवरील नदीवरील पूल यासह अभियांत्रिकी कामाचा यात समावेश आहे. वैतरणा नदी हा बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सर्वात लांब पूल हा 2.32 किमीचा आहे.

वाचलंत का :

  1. Womens Day 2024 : महिलांनी चालवली मालगाडी; लोको पायलट ते गार्ड सर्व महिलाच
  2. Womens Day 2024 : मुंबईकरांचा सुखकर प्रवासासाठी धडपडणारी खतरोंकी खिलाडी 'अनुपमा'; एकमेव महिला मेकॅनिक
  3. अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बुलेट ट्रेन बोगदाचं ब्लास्टिंग; देशात पहिल्यांदाच समुद्राखालून धावणार रेल्वे

ABOUT THE AUTHOR

...view details