महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयाच्या उंबरठ्यावर! केवळ घोषणेची औपचारिकता बाकी - Maval Lok Sabha Results 2024 - MAVAL LOK SABHA RESULTS 2024

Maval Lok Sabha Election Results 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Lok Sabha Election Results) महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विजयी घोडदौड सुरू असून लवकरच त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होईल.

Maval Lok Sabha Election Results 2024 Mahayuti Candidate Shrirang Barne wins
मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे विजयी (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 5:28 PM IST

मावळ Maval Lok Sabha Election Results 2024 :मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी, चिंचवड व मावळ हे विधानसभा मतदारसंघ असून या सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. याचा फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना झाला असून आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून बारणे हे आघाडीवर आहेत. तसंच संपूर्ण मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होईल. या मतदारसंघात महायुतीच्या वतीनं खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं संजोग वाघेरे अशी लढत होती.

मावळ मतदारसंघाचा इतिहास :2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. मावळच्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे. भाजपानंही स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गळाला लावून या भागात वर्चस्व मिळवलं, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील प्रभाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत.

2009 आणि 2014 ची राजकीय स्थिती आजपर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झाली होती. या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेनं एकहाती वर्चस्व राखलंय. 2009 मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतरच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडेच हा मतदार संघ राखण्यात यश मिळवलं होतं. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे दुसऱ्या स्थानी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर हे तिसऱ्या स्थानावर होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत गाजला मतदारसंघ 2019 मध्ये मावळ मतदारसंघ चर्चेत राहिला. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडं राखला. श्रीरंग बारणे यांना 7 लाख 20 हजार 663 मतं पडली होती. तर राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेले पार्थ पवार यांना 5 लाख 4 हजार 750 मतं मिळाली होती. तब्बल 2 लाख 5 हजार मतांनी पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीसाठी 'स्थानिक विरुद्ध बाहेरचा' हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. तर राजाराम पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात होते.

कोण आहेत श्रीरंग बारणे : पिंपरी-चिंचवड शहर हा श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच 1997 साली श्रीरंग बारणे यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. 1997 ते 2012 या काळात श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदं भुषविली. 2014 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बारणे यांनी राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला धूळ चारत विजय मिळवला. तर 2019 च्या निवडणुकीत तर श्रीरंग बारणे यांनी शरद पवारांचे नातू असलेले पार्थ पवार यांना धूळ चारली होती. 2015, 2016, 2018 आणि 2019 या काळात श्रीरंग बारणे हे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसदपटूंपैकी एक होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल :

वर्ष- 2019 श्रीरंग बारणे (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.65% मतं

वर्ष- 2014 श्रीरंग बारणे (विजयी उमेदवार- शिवसेना) 43.62% मतं

वर्ष- 2009 गजानन बाबर (विजयी उमेदवार- शिवसेना) 52.65% मतं

2009 च्या निवडणूकीत मिळालेली मतं :

गजानन बाबर ( शिवसेना ) - 3 लाख 64 हजार 865 (विजयी)

आझम पानसरे (राष्ट्रवादी काँग्रेस ) - 2 लाख 84 हजार 238

2014 च्या निवडणूकीत मिळालेली मतं :

श्रीरंग बारणे ( शिवसेना) - 5 लाख 12 हजार 226 (विजयी)

लक्ष्मण जगताप (शेकाप+मनसे) - 3 लाख 54 हजार 829

राहुल नार्वेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस) - 1 लाख 82 हजार 293

2019 च्या निवडणूकीत मिळालेली मतं :

श्रीरंग बारणे ( शिवसेना ) - 7 लाख 20 हजार 663(विजयी)

पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस ) - 5 लाख 4 हजार 750

हेही वाचा -

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक; नारायण राणेंना मोठी आघाडी - Lok Sabha Election Results 2024
  2. हवेत विरला एनडीएचा ४०० पारचा नारा, महाराष्ट्रासह उत्तप्रदेशमध्ये पिछाडी - Lok Sabha election results 2024
  3. शिंदेंच्या ठाण्यात कोण बाजी मारणार? नरेश म्हस्के आघाडीवर, तर राजन विचारे पिछाडीवर - Thane Lok Sabha Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details