मुंबई Fire To Canteen Of Chitra Cinema:मुंबईतील दादर परिसरात आज (28 जुलै) दुपारी एका सिनेमा हॉलच्या कॅन्टीनला आग लागली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दादर येथील प्रसिद्ध सिंगल स्क्रीन चित्रा सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये दुपारी 3.15 च्या सुमारास आग लागली. ही आग 'लेवल वन' या प्रकारातील असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना अवघ्या दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सिंगल स्क्रीन चित्रा सिनेमा हॉल हा दादर परिसरातील एक प्रमुख सिनेमा हॉल आहे. इथे दररोज शेकडो लोक चित्रपट पाहण्यासाठी येतात.
जीवितहानी टळली :याबाबत मुंबई पालिकेने दिलेली अधिक माहिती अशी की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या कामाला सुरुवात केली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. ही आग सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमध्ये लागली असून केवळ इलेक्ट्रिक ओव्हन, खाद्यपदार्थ, विद्युत उपकरणे आणि वायरिंगपर्यंतच होती. पालिकेच्या माहितीनुसार, आग फक्त किचन पर्यंतच मर्यादित राहिल्यानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आलं.
सिनेमागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न :घटनेनंतर पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई करत परिसर सुरक्षित केला. अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले आणि सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढत परिसर रिकामा करण्यात आला. कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्यता लक्षात घेत अग्निशमन विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. या घटनेनंतर सिनेमागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याचं आश्वासन पालिका प्रशासनानं दिलं आहे.
चित्रा सिनेमाचे निवेदन :