शिर्डी (अहमदनगर) Marriage in only one rupee: साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ २००० साली शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली. गेल्या २३ वर्षात राज्य आणि राज्याबाहेरील सुमारे २००० हून अधिक सर्वधर्मीय जोडप्यांचा विवाह करून कोते दांपत्यांनी कन्यादान करण्याचं पवित्र काम केलंय. शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी (Multi Religious Community Wedding Ceremony) आयोजना नंतर संपूर्ण राज्यात विविध सामाजिक संघटनांनी शिर्डीच्या धर्तीवर सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करून या चळवलीला मोठी गती दिलीय. कोरोनाच्या काळातही नियमांचं पालन करत शिर्डीतील या सामुदायिक सोहळ्यातून विवाह सोहळा करण्यात आला होता.
शाही थाटात होणार विवाह सोहळा : सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक कैलासबापू कोते यांनी सांगितलं की, कोरोनाच्या पाश्वभूमिवर गेल्या तीन वर्षात राज्यातील सर्वसामान्य लोकांना अर्थिक झळ पोहचली आहे. या पाश्वभूमीवर यंदाचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पुर्वीप्रमाणेच शाही थाटात करण्यात येणार आहे. वधु-वरांना मंगळसुत्र, पोशाख आणि संसारापयोगी वस्तु, वधु-वरांची शाही मिरवणूक आणि उपस्थितांना पंचपक्कान्नाचं मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह साधु-संत आणि विविध राजकीय, सामाजिक नेते वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत.