मुंबई Maratha Reservation Mumbai Survey :राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीनं एक ॲप तयार करून त्या ॲपच्या माध्यमातून 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यासाठी शासनाच्या महसूल यंत्रणेमार्फत जिल्हानिहाय आणि तालुका निहाय सर्वेक्षणासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर महानगरपालिका स्तरावर महापालिकेतील अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. मात्र, मुंबईतील सर्वेक्षण पूर्ण झालं असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केला आहे.
मुंबईत झालं शंभर टक्के सर्वेक्षण :मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईतील सर्व विभागांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार 23 तारखेला दोन लाख 67 हजार, 24 तारखेला पाच लाख 81 हजार, 25 तारखेला सहा लाख 87 हजार, 26 तारखेला चार लाख 53 हजार, 27 तारखेला चार लाख 82 हजार, 28 तारखेला तीन लाख 90 हजार, 29 तारखेला चार लाख 18 हजार, 30 तारखेला चार लाख 18 हजार आणि 31 तारखेला एक लाख 62 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आलं.