महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, अपक्ष उमेदवार देण्याबाबत होती बैठक - Maratha community clashed - MARATHA COMMUNITY CLASHED

Maratha community clashed : मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे. आज शुक्रवार (दि. 29 मार्च) येथील जळगाव रस्त्यावरील मराठा मंदिर येथे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा करण्यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये ही हाणामारी झाली.

मराठा समजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी
मराठा समजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 3:38 PM IST

मराठा समजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी

छत्रपती संभाजीनगरMaratha community clashed: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात वातावरण तापलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून (Maratha community ) मराठा समाजाकडून प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक अपक्ष उमेदवार उभा करण्याची खेळी खेळली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधवांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. त्या बैठकीत उमेदवार उभा करण्यावरून चर्चा सुरू असतानाच, अचानक दोन गटात वाद झाला आणि त्यातूनच बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा समाजातील अंतर्गत वाद समोर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत असा वाद झाल्याने आंदोलनावर याचा थेट परिणाम होऊ शकतो अशी चर्चा आहे.

बैठकीत मारहाण :शुक्रवारी दुपारी मराठा मंदिर येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा करण्याबाबत तीस मार्चपूर्वी निर्णय घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. (Two groups clashed Sambhajinagar) त्या अनुषंगाने दुपारी बाराच्या सुमारास मराठा मंदिर येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोणीही उमेदवारांचे नाव घेऊ नये अशा सूचना सर्व आयोजकांकडून देण्यात आल्या होत्या, असं असलं तरी बैठकीत मत मांडताना काही जणांनी आपापल्या जवळच्या उमेदवारांची नाव घेत चर्चा केली. त्यावरूनच वादाला सुरुवात झाली काहीजणांनी मिळून आपला मुद्दा मांडणाऱ्या दोघांना भर कार्यक्रमातच मारहाण केली.

वाद पेटला :लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सर्व स्तरातून अपक्ष उमेदवार उभे करायचे याबाबत मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे (दि. 24 मार्च) रोजी महत्वाची बैठक आयोजित केली होती. उमेदवारी देण्याबाबत तीस तारखेला बैठक घेत समाजाच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेऊ असं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्या अनुषंगाने (दि. 29 मार्च) रोजी काही जिल्ह्यात मराठा समाजाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या.

उमेदवार उभे केले तरी मतदान होणार का : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमेदवार देण्याबाबत बैठक करण्यात आली होती. मात्र, यात पुन्हा वादविवाद झाले. उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी आपलं मत मांडणाऱ्या युवकांना जबर मारहाण केली. जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या 30 तारखेच्या बैठकीआधीच असा वाद निर्माण झाल्यानं सुरू झालेलं आंदोलन पुढे जाणार कसं आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले तरी मतदान पडणार कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details