नागपूर :विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सहलीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बसमधील अनेक विद्यार्थी जखमी - NAGPUR BUS ACCIDENT
सरस्वती शाळेच्या सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावर बचावकार्य सुरू असून विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं.
Published : Nov 26, 2024, 11:35 AM IST
सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल :सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथं जात होती. यावेळी पेंढरी गावाजवळ बसला अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे, मात्र त्याला कोणताही दुजोरा अद्याप मिळाला नाही. आज सकाळी एकूण 5 बस विद्यार्थ्यांना घेऊन बोरधरणच्या दिशेनं जाताना चार बस पुढं निघाल्या. तर शेवटी असलेल्या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसला अपघात झाला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका विद्यार्थिनीचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढं येत आहे. हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :