छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil On Amit Shah :गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी "आम्ही अनेक आंदोलनं हाताळली आहेत, त्याप्रमाणे मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू," असं वक्तव्य केलं होतं. अमित शाह यांच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मराठा आंदोलन व्यवस्थित हाताळलं नाही, तर चिलमीची चहा पिण्याची वेळ येईल," असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.
अमित शाहांवर टीका :"गुर्जर आणि पटेल समाजाचं आंदोलन तुम्ही हाताळलं तसं मराठ्यांचंही आंदोलन हाताळू असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या पद्धतीनं आमचं आंदोलन हाताळू नका. मराठा आरक्षणाचं आंदोलन हाताळताना काळजी घ्या. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलन गोडीगुलाबीनं हाताळलं, तर तुम्हाला सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. पण तुम्ही मराठा आंदोलन व्यवस्थित हाताळलं नाही, तर चिलमीची चहा पिण्याची वेळ येईल," असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
राजकीय एन्काऊंटर होईल :अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, महाजन, जोशी यांनी पक्षासाठी स्वतःचा देह झिजविला. मात्र, तुम्ही त्यांना दूर केलं. वेळ आली की उपयोग करायचा आणि नंतर त्यांना दूर करायचं, ही भाजपाची पद्धत आहे. तुमच्याच लोकांचा तुम्ही घात केला. तुम्ही वर येण्यासाठी कोणत्या थराला गेलात हे सांगायची गरज नाही. अमित शहा यांनी बरेच राजकीय एनकाउंटर केलं, आता तुमचं राजकीय एन्काऊंटर होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी बोलल्यावर आता तुमचे माकडं आणि इतर लोक बोलतील, असंही जरांगे पाटील म्हणाले.
भाजपासोबत काम करणाऱ्यांची वाट लागली : "भाजपानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांमध्ये फूट पाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणायचं सोडुन त्यांना दूर करण्याचं काम भाजपानं केलं. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यामुळं राज्यात भाजपाला बळ मिळालं. भाजपासोबत काम करणाऱ्यांची वाट लागली," असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय.
हेही वाचा
- "विरोधक अमेरिकेत जाऊनही उद्घाटन करू शकतात..." उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला - Devendra Fadnavis On MVA
- विधानसभेचा 'फड' गाजवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसे देणार उमेदवार; नावही ठरलं - MNS Vs Devendra Fadnavis
- वैमानिकानं विमान उडवण्यास दिला नकार; उदय सामंतांना कारनं गाठावं लागलं छत्रपती संभाजीनगर - Uday Samant Belora Airport