महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट; पाच कामगारांचा होरपळून मृत्यू - NAGPUR Blast

Major Blast in Nagpur : नागपूर-अमरावती मार्गावर असलेल्या स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट झाला. यात किमान पाच कामगारांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

बारुद कंपनीत मोठा स्फोट
बारुद कंपनीत मोठा स्फोट (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 3:20 PM IST

Updated : Jun 13, 2024, 4:46 PM IST

नागपूर Major Blast in Nagpur : नागपूर-अमरावती मार्गावर असलेल्या धामणा इथल्या स्फोटकांच्या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर 5 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केलाय.

नागपुरात स्फोटक पदार्थांच्या कंपनीत मोठा स्फोट (ETV Bharat Reporter)

सहा कामगारांचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तहसीलच्या धामणा इथं एक कंपनी आहे. या कंपनीत स्फोटकांशी संबंधित कामं केली जातात. आज सकाळी सर्व कामगार नियोजित वेळेत कामावर आले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास पॅकेजिंग विभागात आग लागल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर काही वेळात या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कंपनीच्या आत 10 कामगार काम करत होते. हा स्फोट इतका भीषण होता की तिथं काम करणाऱ्या 10 पैकी पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीनं नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र,आग कशी लागली हे अद्याप समोर आलेलं नाही.

रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले आयुक्त : याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलं की, धामणा येथील स्फोटक बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. कंपनीत कामगार स्फोटके भरत असताना दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला. पोलिसांचं पथक घटनास्थळी आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे." तसंच घटनास्थळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं की, "धामना गावाजवळील गनपावडर बनवणाऱ्या कारखान्यात स्फोटाची ही घटना घडली. कारखान्याचे व्यवस्थापक व मालक फरार आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे."

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. गाझियाबादमध्ये अग्नितांडव! आगीत होरपळून दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू - 5 Death in Ghaziabad Fire
  2. डोंबिवली एमआडीसी मधील दोन कंपनीत भीषण आग; जीवितहानी नाही, कंपन्यांचं मोठं नुकसान - Dombivli MIDC Fire
  3. ठाण्यात 27 मजली इमारतीत लागली भीषण आग, गुदमरल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू - Thane Fire News
Last Updated : Jun 13, 2024, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details