सातारा Pusesawali Riots :सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली. नितीन महादेव वीर, असं त्याचं नाव असून वडूज न्यायालयानं त्याला बुधवारपर्यंत (4 सप्टेंबर) पोलीस कोठडी दिली.
अटकपूर्व जामीनावरील सुनावणी दिवशीच अटक :पुसेसावळी दंगलीच्या घटनेतील मुख्य संशयित नितीन महादेव वीर याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 24 तारखा झाल्या आहेत. दि. 2 सप्टेंबर रोजी जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्या पथकानं मुख्य फरारी संशयिताला सुनावणी दिवशीच घराच्या परिसरात सापळा रचून पकडलं.
वादग्रस्त पोस्टवरून उसळली होती दंगल :सोशल मीडियावर महापुरूषांबद्दल टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात 11 सप्टेंबर 2023 रोजी रात्री दंगल उसळली होती. जमावानं प्रार्थनास्थळावर हल्ला करून 11 जणांना बेदम मारहाण केली होती. वाहनांची जाळपोळ आणि घरं, दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात नूरहसन शिकलगार नावाच्या विवाहित तरूणाचा मृत्यू झाला होता. घटनेमुळं जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
वर्षभरापासून पुसेसावळीत पोलीस बंदोबस्त :दंगल आणि तरुणाच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात पुसेसावळी घटनेचे पडसाद उमटले होते. त्यामुळं अनेक दिवस पुसेसावळीला पोलीस छावणीचे स्वरूप होते. तणाव निवळल्यानंतर आणि परिस्थिती पूर्वपदावर असल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांची संख्या कमी करण्यात आली. परंतु, संपूर्ण बंदोबस्त हटवला नाही. गेली वर्षभर पुसेसावळीत पोलीस तैनात आहेत.
हेही वाचा
- वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून आवळल्या मुसक्या - Vanraj Andekar Murder Case
- रामगिरी महाराजांचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाका; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश - Ramgiri Maharaj Controversial video
- फलटणमधील हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली ४ लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक - Honeytrap Satara