महाराष्ट्र

maharashtra

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय : 'ही' आहेत महायूतीच्या विजयाची 10 कारणं - MLC Election Results

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 5:25 PM IST

MLC Election Results 2024 : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीत 'महायुती'चा दणदणीत विजय झाला आहे. 11 पैकी 9 जागा युतीनं जिंकल्या आहेत. त्यापैकी फक्त 2 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Mahayuti Leaders
महायुतीचे नेते (ETV Bharat MH Desk)

मुंबई MLC Election Results 2024: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यात महायुतीचे 9 उमेदवार विजयी असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तसंच शिवसेनेचे (उबाठा) नेते मिलिंद नार्वेकर विजय झाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. परंतु विधान परिषदेतील विजयामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत महायुतीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत विजय संपादन केला आहे. त्यामुळं महायुतीच्या विजयाची कारणं काय आहेत? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

महायुतीच्या विजयाची दहा कारणे कोणती ? :

  • महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या समन्वय
  • महायुतीच्या एकूण मतांपैकी महायुतीच्या उमेदवारांच्या मताचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभ्यास
  • महायुतीच्या आमदारांना मतदान करण्याचं प्रशिक्षण
  • महाविकास महाविकास आघाडीतील सहा ते सात आमदारांची मत वळवण्यात महायुतीच्या नेत्यांची रणनीती
  • महायुतीच्या नेत्यांच्या बैठकासह आमदारांशी संपर्क
  • विरोधी पक्षातील आमदारांची मते फोडण्यात महायुतीची चाल
  • शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीनं दिलेल्या उमेदवाराचा महायुतीला फायदा
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा महायुतीला फायदा
  • आमदार झिशान सिद्दिकीच्या मताचा महायुतीला फायद्या झाल्याची चर्चा.
  • शरद पवारांनी विनंती करूनही आमदारांनी मतदानं न केल्यानं मत महायुतीच्या पारड्यात

  • विधान परिषद निवडणुक 2024 निकाल :
    भाजपा - 5
    पंकजा मुंडे – 26 (विजयी)
    परिणय फुके – 26 (विजयी)
    योगेश टिळेकर – 26 (विजयी)
    अमित गोरखे – 26 (विजयी)
    सदाभाऊ खोत – 23 (दुसऱ्या क्रमांकांची पसंतीची मतं)

    शिवसेना - 2 उमेदवार विजयी
    भावना गवळी – 24 (विजयी)
    कृपाल तुमाने – 25 (विजयी)

    राष्ट्रवादी अजित पवार गट -2 उमेदवार विजयी
    राजेश विटेकर – 23 (विजयी)
    शिवाजीरावर गर्जे – 24 (विजयी)

    महाविकास आघाडीचे उमेदवार
    काँग्रेस - 1 उमेदवार विजयी
    प्रज्ञा सातव – 25 (विजयी)

    शिवसेना उद्धव ठाकरे गट - 1 उमेदवार विजयी
    मिलिंद नार्वेकर – 22 (दुसऱ्या क्रमांकाची पसंतीची मतं..)

    राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थित उमेदवार जयंत पाटील (शेकाप) – 12 पराभूत.

'हे' वाचलंत का :

  1. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi
  2. शरद पवार यांनी डाव टाकल्यामुळे जयंत पाटलांचा बळी; सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप - MLC Election
  3. "बेसावध राहिलो, पण..."; विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर जयंत पाटी यांनी व्यक्त केली खंत - MLC Election Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details