महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा; विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फुटणार नारळ - MVA Campaign Assembly Election 2024 - MVA CAMPAIGN ASSEMBLY ELECTION 2024

MVA Campaign Assembly Election 2024 : राज्यात सध्या सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील मोर्चेबांधणी सुरू केली. मतदारसंघातील दौरे आणि गाठीभेटी वाढल्या आहेत.

Maharashtra Politics
महाविकास आघाडीचे नेते (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 7:50 AM IST

Updated : Aug 16, 2024, 8:16 AM IST

मुंबई MVA Campaign Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? मोठा भाऊ कोण? कोण कुठून निवडणूक लढणार? अशा विविध प्रश्नांनी राज्याचं राजकारण तापलं आहे. ख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी जोरदार आक्षेप घेतला. तर दुसरीकडे काँग्रेसनं प्रचाराची धुरा मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज (16 ऑगस्ट) मुंबईत पार पडत आहे.

प्रचाराचे फुंकणार रणशिंग : लोकससभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळेल, अशी अपेक्षा मविआचे नेते व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

विधानसभेची आखणार रणनीती : लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम टिकून राहावं, यासाठी आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. तसंच ''चला निर्धार करू या, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणू या'' असा निर्धारही यावेळी करण्यात येणार आहे. विधानसभेच्या दृष्टिकोनातून या मेळाव्यात रणनीती आखतानाच निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगही फुंकले जाणार असल्याची माहिती शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या मेळाव्याकडे सत्ताधारी पक्षांबरोबरच देशातील महत्त्वाच्या पक्षांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलाच मेळावा : लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मेळाव्याला शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी तसंच सीपीएमचे मिलिंद रानडे आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन : मुंबई, ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील जिल्हास्तरावरील पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, असं शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधला जावा आणि एकपणा असावा, यासाठी हा मेळावा घेण्यात आला असून मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

वरिष्ठ नेते एका व्यासपीठावर : दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी "ठाकरे सरकार २ येत आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील, काँग्रेसमध्ये एक तरी चेहरा आहे का?" असं वक्तव्य करून संघर्षाची ठिणगी पेटवली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा होणारा हा संयुक्त मेळावा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीचे सर्वज वरिष्ठ नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत.

हेही वाचा

  1. शरद पवार, नाना पटोले यांना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य आहेत का - भाजपाचा सवाल - Sanjay Raut
  2. दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडी सोपविणार मोठी जबाबदारी? काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा - Assembly Election 2024
Last Updated : Aug 16, 2024, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details