महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाडासह कोकण विभागाला हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; पेरणीच्या कामांसाठी बळीराजाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Maharashtra Weather Forecast - MAHARASHTRA WEATHER FORECAST

Monsoon Rain Weather Update Maharashtra : जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. राज्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यानं नांगरणी करून तयार असलेला शेतकरी पेरणीच्या कामांसाठी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Monsoon Rain Weather Update Maharashtra
मराठवाडा आणि कोकणला हवामान विभागाचा यलो अलर्ट; पेरणीच्या कामांसाठी बळीराजाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 10:58 AM IST

मुंबई Monsoon Rain Weather Update Maharashtra : महाराष्ट्रात 9 जून रोजी मान्सूनं दमदार आगमन केलं. मात्र, असं असलं तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यानं नांगरणी करून तयार असलेला शेतकरी पेरणीच्या कामांसाठी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान खात्यानं आज पुन्हा एकदा अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजननं वर्तवली आहे. तर, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.



भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील डिव्हिजननं दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात पावसाच्या मोसमी वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळं मान्सूनचा वेगही मंदावलाय. याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यातील काही भागासह विदर्भात अद्याप देखील पाऊस न झाल्यानं या भागातील तापमानात पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. तर 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याचबरोबर उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आलीये. दुसरीकडं विदर्भातही काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेही वाचा -

  1. राज्यात पुढील दोन दिवस यल्लो अलर्ट, अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा - Yellow alert in Maharashtra
  2. अचानक पडलेल्या पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ, मान्सून पूर्व पावसाचा हवामान खात्याचा दावा - Mumbai Monsoon Update
  3. मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी? - Maharashtra Weather Forecast

ABOUT THE AUTHOR

...view details