मुंबईMaharashtra Weather Update :मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबईसह कोकणातील दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. यासोबतच मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर आणि ठाण्यात पुढील 24 तासांत 40 ते 50 किलोमीटर प्रतीतास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट : हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबईतील पुढील चार दिवसाचा पावसाचा अंदाजदेखील वर्तवला आहे. शनिवारी 22 जून रोजी मुंबईत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. याच स्वरूपाचा पाऊस मुंबईत 26 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं.
पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील 5 दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिमेकडील मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कोकणातील पश्चिमकिनारपट्टी भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढील 5 दिवस याचप्रमाणे राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
हेही वाचा
- ...म्हणून आम्हाला अपेक्षा नाही; लोकसभा उपसभापतीबाबत शरद पवार काय म्हणाले? - Sharad Pawar
- भारतात प्रथमच ऊस शेती फायदेशीर करण्यासाठी एआयचा होणार वापर; कृषी संशोधनाचं नवीन दालन होणार खुलं - Sugarcane Farming
- जिवा-शिवाच्या बैलजोडीवर चढला शृंगारी साज, कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर बैलांची सवाद्य मिरवणूक - Bendur Festival Kolhapur