मुंबई Maharashtra SSC Result 2024 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (27 मे 2024) जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेनंतर विभागीय टक्केवारी बोर्डाकडून जाहीर केली जाईल, आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं दहावीचा निकाल हा पाहू शकतील.
कुठं चेक करता येणार निकाल?
- mahresult.nic.in
- sscresult.mahahsscboard.in
- sscresult.mkcl.org
- results.digilocker.gov.in
ऑनलाईन निकाल कसा बघायचा?
- निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आपल्या आईचं नाव टाकावं लागेल.
- त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यावर रिझल्ट दिसेल.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी कशी आणि कधीपर्यंत करता येईल? :ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याला प्राप्त झालेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडं ऑनलाईन पध्दतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) अर्ज करता येईल. तसंच गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल.
दहावीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान घेण्यात आल्या होत्या. तसंच 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीये. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की, बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर होईल.
हेही वाचा -
- बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी - maharashtra hsc result 2024
- दहावीच्या निकालाची तारीख ठरली; कसा व कुठं पाहता येणार? जाणून घ्या... - SSC Result 2024
- कुर्ल्यातील आईनं लेकासह दिली 12वीची परीक्षा, दोघांनी मारली बाजी...सर्वत्र होतंय कौतुक - Son Mother HSC Result