मुंबई Ishan Kishan Blasting Half Century : भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. त्याचवेळी आयपीएलमध्येही त्याचा संघ बदलला आहे. यावेळी मुंबई इंडियन्सनं इशानला रिटेन केलं नाही किंवा त्याला लिलावात विकत घेतलं नाही. या सगळ्यात इशान किशनच्या बॅटमधून तुफानी इनिंग पाहायला मिळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये त्यानं ही खेळी खेळली होती. त्यानं झारखंडला अरुणाचल प्रदेशविरुद्धचा सामना अवघ्या 27 चेंडूत जिंकून दिला.
Ishan 53 runs in 16 balls (2x4, 7x6) Jharkhand 69/0 #ARPvJHA #SMAT Scorecard:https://t.co/1Hd5r1a23j
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 29, 2024
इशान किशननं केली वादळी खेळी : अरुणाचल प्रदेश आणि झारखंड यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात अरुणाचल प्रदेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली मात्र अरुणाचल प्रदेश संघ 20 षटकांत केवळ 93 धावा करत सर्वबाद झाला. अशा स्थितीत झारखंडसमोर सामना जिंकण्यासाठी 94 धावांचं लक्ष्य होतं. झारखंडचा फलंदाज इशान किशननं हे लक्ष्य अगदी सोपं केलं आणि अवघ्या 4.3 षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
ISHAN KISHAN SMASHED FIFTY FROM JUST 16 BALLS IN SYED MUSHTAQ ALI 🤯
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
- Opening for Jharkhand, Ishan has dominated the run chase. pic.twitter.com/bHBeuKLdYB
किशननं मारले 9 षटकार : झारखंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन आणि उत्कर्ष सिंग यांनी डावाला सुरुवात केली आणि दोन्ही खेळाडू नाबाद माघारी परतले. उत्कर्ष सिंगनं 6 चेंडूत केवळ 13 धावा केल्या. दुसरीकडे इशान किशननं चौकार आणि षटकार ठोकले. इशान किशननं 334 च्या स्ट्राईक रेटनं 23 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 9 षटकार मारले. म्हणजेच इशान किशननं एकहाती संघाच्या 81 टक्के धावा केल्या आणि संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
ISHAN KISHAN SCORED 77* RUNS FROM JUST 23 BALLS WITH 5 FOURS & 9 SIXES 🥶
— Johns. (@CricCrazyJohns) November 29, 2024
- Jharkhand chase down 94 runs from just 4.3 overs in SMAT...!!!! pic.twitter.com/W41b4OanhW
इशान किशन हैदराबादकडून खेळणार : इशान किशन आता आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं मेगा लिलावात त्याच्यावर 11.25 कोटी रुपये खर्च केले होते. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. ईशान 2019 आणि 2020 मध्ये दोन वेळा मुंबई इंडियन्सच्या चॅम्पियन टीमचा भाग होता. पण आता त्याची टीम बदलली आहे. त्याचवेळी इशान किशनला टीम इंडियाकडून खेळून एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मात्र, त्याला नुकतंच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत अ संघात स्थान मिळालं होतं.
हेही वाचा :