महाराष्ट्र

maharashtra

अतिवृष्टीमुळे आज ठाण्यातील शाळांना सुट्टी. आयुक्त सौरभ राव - Maharashtra Rain Updates

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 12:15 PM IST

Maharashtra Rain Updates राज्यात काही दिवसांपासून पावसाने कहर केलाय. हवामान विभागने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे ठाण्यासह नवी मुंबई, पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Maharashtra Rain Updates
आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष (ETV Bharat Reporter)

ठाणे Maharashtra Rain Updatesगेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने अक्षरशः कहर केलाय. ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात 180 मि.मी इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आलीय. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.

रेड अलर्ट: शुक्रवारी मोठी भरती असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. परिणामी महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केलं. नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पंप बसविण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

आपत्कालीन व्यवस्थापन: नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात 20 पेक्षा जास्त फोनची सुविधा 24x7 कार्यान्वित आहेत. तसंच आलेल्या फोनवरुन नोंदवल्या गेलेल्या प्रत्येक तक्रारीचं निवारण पूर्ण होईपर्यत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.

या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट:राज्यातील सातारा, रायगड आणि रत्नागिरीमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे. परिणामी कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

पर्यटनस्थळ बंद: अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक पर्यटनस्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. तीन नंबरचा बावटा कायम असल्यामुळे गेटवे-एलिफंटा, जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक अद्यापही खंडित आहे. यामुळे सागरी वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. तसच बेटावरील पर्यटक आधारित व्यावसायिकांवर उपासमारीचं संकट आलं आहे.

  • हेही वाचा
  1. मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र 'या' तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी - Maharashtra Rain Updates
  2. मुसळधार पावसामुळं हवाई वाहतूक विस्कळीत; मुंबई विमानतळावरील उड्डाणं रद्द, प्रवाशांना फटका - Heavy Rain Hit Flights


ABOUT THE AUTHOR

...view details