महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2025 मधील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर - MPSC EXAM 2025 SCHEDULE

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 2025 मधील विविध परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे जाहीर केलेलं वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असणार आहे. यामध्ये काही बदलही होऊ शकतात.

MPSC EXAM 2025 SCHEDULE
एमपीएससी परीक्षा 2025 चे वेळापत्रक (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 7 hours ago

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिध्द केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वेळापत्रकात बदल होऊ शकतो : जाहीर करण्यात आलेलं वेळापत्रक अंदाजित असून, त्यामध्ये बदल होऊ शकतो. काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी, आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी केलं आहे.

वेळापत्रकात खालील परीक्षांचा समावेश :

  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब आणि गट-क सेवा संयुक्त परीक्षांमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षा
  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र विद्युत आणि यांत्रिकी परीक्षा
  • अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
  • निरीक्षक वैद्यमापक शास्त्र मुख्य परीक्षा
  • राज्यसेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा

हेही वाचा

  1. राज्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त रिक्त पदे भरताना कंत्राटी पद्धत नको, महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचा आग्रह
  2. अभिनेत्री कतरिना कैफ साईचणी झाली नतमस्तक, शिर्डीत येऊन घेतलं साई समाधीचं दर्शन
  3. राजकारण केले तर राजकीय उत्तर मिळणार-देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details