महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल, काय केला आरोप?

Aaditya Thackeray News : कोस्टल रोडच्या कामावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोस्टल रोड तयार नाही. पण श्रेय घेण्यासाठी सरकार त्याचं उद्घाटन करत असल्याचा आरोप माजी मंत्री ठाकरे यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 4:03 PM IST

Updated : Feb 4, 2024, 4:21 PM IST

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचे आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. घटनाबाह्य सरकार निवडणुकीपूर्वी श्रेय लाटण्यासाठी विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करत असल्याचा आरोप केला. हे उद्घाटन आधी व्हायला हवं होतं. मात्र त्यावेळी निवडणुका नसल्यामुळं घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीपूर्वी विकासकामांची उद्घाटनं करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार ठाकरे यांनी केली.

श्रेय लाटण्यासाठी कामांचं उद्घाटन :वरळी-शिवडी सीलिंगचं काम ऑक्टोबर 2023 मध्ये पूर्ण होणार होतं. तसंच कोस्टल रोडचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. महाविकास आघाडीचं सरकार असतं, तर ही कामं पूर्ण झाली असती. सुमारे तीन महिन्यांत एमटीएचएलच काम पूर्ण झालं होतं. दिघा रेल्वे स्थानक नऊ महिन्यांपूर्वी पूर्ण झालं होतं. मात्र, या सरकारनं उद्घाटन केलं नाही. याबाबत आम्ही सातत्यानं ओरड करत होतो. काम पूर्ण होऊनही उद्घाटन झालं नाही. मात्र, आता महायुतीचे सरकार श्रेय मिळविण्यासाठी निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांचं उद्घाटनं करत आहे. दुसरीकडं सध्या कोस्टल रोडचं काम अपूर्ण आहे. मात्र, याच महिन्यात उद्घाटन होत आहे. उद्घाटनाचा काय उद्देश ? तर, या कामाचं श्रेय सरकारला घ्यायचं आहे. त्यासाठी घटनाबाह्य सरकार उद्घाटन करत आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर केलाय.

रेसकोर्सची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न :मुंबईतील रेस कोर्सवर दररोज हजारो मुंबईकर धावणे, फिरणे, व्यायाम आणि योगासाठी जातात. तिथंच एक लाफ्टर क्लब आहे. इथंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मुंबईतील हे एकमेव ठिकाण आहे. ते सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुलं आहे. याच रेस कोर्सवर मुख्यमंत्र्यांचा एका बिल्डर मित्राला क्लबहाऊससाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या रेसकोर्सचे तीन भाग पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आरडब्लूआरटीसीच्या कमिटी मेंबरसोबत मुख्यमंत्र्यांचं साटेलोटं सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

थीम पार्क नाही तर आता सेंट्रल पार्क :"महालक्ष्मी रेसकोर्सवर घोड्यांसाठी तबेले बांधणार आहेत. यावर बीएमसी 100 कोटी खर्च करणार आहे. हे घोडे सुटाबुटातील लोकांचे आहेत. त्यांच्यासाठी तबेलं बांधले जाणार आहेत. यासाठी जनतेचा पैसा का वापरला जात आहे? आम्ही याला विरोध करू,' असा इशारा त्यांनी दिला. आदित्य ठाकरे यांनी दिली. आता आयुक्त इक्बाल सिंग चहल सांगतात थीम पार्क नाही, आता सेंट्रल पार्क करणार आहोत. यासाठी त्यांनी काही सेलिब्रिटींना ट्विट करण्यास सांगितलं. मात्र, आमचा थीम पार्क आणि सेंट्रल पार्कला विरोध असेल.

हे वाचलंत का :

  1. छगन भुजबळांना रामदास आठवलेंनी दिली 'RPI' प्रवेशाची ऑफर
  2. संभाजीराजेंसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा, कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - आमदार सतेज पाटील
  3. 'त्या' प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात? लवकरच होणार निर्णय
Last Updated : Feb 4, 2024, 4:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details