अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया मुंबई :महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास एजन्सींचा वापर केल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच भाजपा ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांना दररोज नाहक त्रास देत आहे. तर दुसऱ्याबाजूला ईडीच्या माध्यमांतून ब्लॅकमेलिंग करून फसवणुकीचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
ईडी भाजपाचे फ्रंटलं ऑर्गनायझेशन :ईडी भाजपाची फ्रंटल ऑर्गनायझेशन असून त्याचं लक्ष आता महाराष्ट्राकडं वळालं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांबाबत आपलं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, त्यांचं काम त्यांनी करत राहावं. ईडीचा अधिकारी म्हणून सेटलमेंट करणारी 'ती' कोण आहे. त्या अनुषंगानं EOW मध्ये तक्रारी देखील झाल्या आहेत. बिल्डर सुरक्षित नाही, त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहे. आज त्यांच्यावर ईडीची, आयकर विभागाची कारवाई होणार आहे. ईडीच्या नावानं ब्लॅकमेलिंगचा उद्देश मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असं लोंढे यांनी म्हटलंय.
विद्यार्थ्यांना धमकी देण्याचा विचार करू नका :डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पंधरा हजार विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. या विद्यापीठांमध्ये फार्मसी आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे पेपर ऑनलाइन तपासले जातात, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. पेपर तपासणीचं काम खाजगी संस्थांकडं दिलंय. ही संस्था जाणूनबुजून विद्यार्थ्यांना नापास करत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्यानंतर त्यांना टेलीग्रामद्वारे संदेश पाठवून तुम्ही पैसे भरल्यास तुम्हाला पास करण्यात येईल, असं सांगितलं जातयं. विद्यार्थ्यांना धमकावलं जात असून कारवाईची धमकी दिली जात आहे. मात्र मी कुलगुरूंची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार असल्याचं अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे. उद्या रायगड येथील लोणेरे येथे जाणार असून, विद्यार्थ्यांना धमकावण्याची चूक कोणीही करू नये, असा इशाराही त्यांनी विद्यापीठाला दिला आहे.
हे वाचलंत का :
- लोकसभा निवडणूक 2024 : मुंबईतील सर्व जागा जिंकणार, भाजपाचा निर्धार
- फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 42 हून अधिक गंभीर जखमी
- गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल