मुंबई Mumbai Railway Stations Rename: मुंबई तसंच उपनगरांतील उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या इंग्रजी नावांचं मराठी नामकरण करण्याची शिफारस विधानसभेनं आज केंद्र सरकारकडं केली. यासंदर्भात बोलताना मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात सांगितलं की, मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक, असं करण्याचा ठराव मी मांडतो. तसंच सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी रेल्वे स्थानक, स्टॅंडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक बदलण्याची शिफारस महाराष्ट्र विधानसनं केंद्र सरकारला करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे तसंच हर्बल रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडं पाठवण्यात येणार आहे. त्यामुळं ब्रिटीशकालीन पाऊलखुणा पुसून टाकण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं जाणार आहे.