महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पार्टीत बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास पत्नीचा नकार : सॉफ्टवेयर इंजिनीयर पतीनं दिला तिहेरी तलाक, गुन्हा दाखल - ENGINEER GIVES TRIPLE TALAQ TO WIFE

कल्याणच्या सॉफ्टवेयर इंजिनीयर पतीनं पत्नीला पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा तगादा लावला. मात्र पत्नीनं नकार देताच, त्यानं तिहेरी तलाक दिल्यानं मोठी खळबळ उडाली.

Engineer Gives Triple Talaq To Wife
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 2:01 PM IST

ठाणे :ठाण्यातील 45 वर्षीय पतीनं 28 वर्षीय पत्नीला पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तगादा लावला. मात्र तिनं नकार दिल्यानं पतीचा पारा चांगलाच वाढला. त्यानं पहिल्या पत्नीला देण्यासाठी दुसऱ्या पीडित पत्नीला माहेरावरून 15 लाख आणण्यास सांगितलं. मात्र, तिनं रक्कम देण्यासही नकार दिल्यानं आरोपी पतीनं पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तलाक विरोधी कायदासह विविध कलमानुसार 45 वर्षीय सॉफ्टवेयर इंजिनीयर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑफिस पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंधासाठी टाकला दबाव :मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आरोपी पती हा कल्याण पश्चिम भागातील एका हायप्रोफाईल सोसायटीत राहत असून तो पेशाने सॉफ्टवेयर इंजिनीअर आहे. त्याचा निकाह छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीशी जानेवारी 2024 मध्ये झाला निकाह नंतर पीडित पत्नी कल्याणला सासरी आली असता, आरोपी पतीचा पहिला निकाह झाल्याचं समोर आलं असून सुरुवातीचे काही महिने गुण्यागोवींदानं संसार सुरू झाला. मात्र आरोपी पती तिला सतत माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास देऊ लागला. त्यानं तिला सांगितले की, पहिल्या पत्नीला घटस्फोटासाठी 15 लाख रुपये द्यायचे आहेत. ते पैसे तुझ्या माहेरातून आण. यावरच आरोपी पती थांबला नाही, तर त्याने पत्नीला ऑफिस पार्टीत बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची तिच्याकडं मागणी केली. या मागणीला तिनं स्पष्ट नकार दिला. यामुळं वाद होऊन रागाच्या भरात पतीनं तिला मारहाण करत तिहेरी तलाक देऊन घराबाहेर काढलं.

पहिल्या पत्नीला तलाक देण्यासाठी मागितले 15 लाख :दरम्यान पीडित पत्नी माहेरी आल्यावर तिने 19 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील जिन्सी पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली. मात्र गुन्हा कल्याण शहरात घडल्यानं हा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर रोजी पोलिसांनी वर्ग केला. त्यानंतर कल्याणच्या बाजारपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी पतीच्या विरोधात तीन तलाक आणि मारहाणीचे गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे. पतीने तीन तलाक दिल्यानंतर पत्नीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. तर दुसरीकडे या प्रकारामुळे समाजातील अशा घटनांविरोधात कठोर कारवाईची मागणी आता पुढे येत आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की "पीडित महिला ही छत्रपती संभाजी नगरमध्ये राहणारी असून तिचा विवाह कल्याणमधील गुन्हा दाखल असलेल्या आरोपीशी झाला. याच डिसेंबर महिन्यात तिच्या पतीनं तिला आपल्या बॉसशी पार्टीमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली, मात्र तिने नाकार दिला. शिवाय तिच्याकडं पहिल्या पत्नीला देण्यासाठी 15 लाखाची मागणीही केली, असं पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस करीत आहे."

हेही वाचा :

  1. पत्नीला व्हॉट्सॲपवर दिला तिहेरी तलाक; पती विरोधात गुन्हा दाखल - Triple Talaq
  2. किडनी देऊन भावाचा जीव वाचवणं महिलेला पडलं महागात; संतापलेल्या पतीनं सौदी अरेबियातून व्हॉट्सअ‍ॅप वर दिला 'तलाक'
  3. Divorce after 1 hour of marriage: दोन बायका अन् फजिती ऐका.. दुसरे लग्न केले अन् पहिली बायको येताच दिला तलाक..

ABOUT THE AUTHOR

...view details