देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 19 नवीन चेहऱ्यांना संधी :
भाजपाकडून नव्यानं संधी देण्यात आलेले आमदार :
- नितेश राणे
- पंकज भोयर
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- आकाश फुंडकर
- शिवेंद्रराजे भोसले
- अशोक उईके
- माधुरी मिसाळ
- मेघना बोर्डीकर
Published : 6 hours ago
|Updated : 4 hours ago
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याला नागपुरात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हसन मुश्रीफ, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगल प्रभात लोढा आदींनी शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात मंगल प्रभात लोढा यांनी गुजरातीत शपथ घेतल्यानं विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र अद्याप विरोधकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
LIVE FEED
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 19 नवीन चेहऱ्यांना संधी :
भाजपाकडून नव्यानं संधी देण्यात आलेले आमदार :
शिवसेनेकडून नव्यानं संधी देण्यात आलेले आमदार :
राष्ट्रवादीकडून नव्यानं संधी देण्यात आलेले आमदार :
संजय सिरसाट यांच्या शपथविधीवेळी प्रचंड घोषणाबाजी :संभाजीनगर पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांना यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. मागील वर्षापासून संजय सिरसाट यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांना संधी मिळणार, अशी मोठी चर्चा होती. मात्र त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावर समाधान मानावं लागलं. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय सिरसाट यांना स्थान देण्यात आलं. त्यामुळे शपथ घेण्यासाठी संजय सिरसाट उठले असता, प्रचंड घोषणाबाजी झाली. त्यांच्यानंतर नितेश राणे, आकाश फुंडकर, प्रकाश आबिटकर, यांनी शपथ घेतली.
पंकजा मुंडे धनंजय मुंडे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपुरात सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यात बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदं मिळाली आहेत. धनंजय मुंडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर पंकजा मुंडे यांना भाजपाकडून मंत्रिपद देण्यात आलंल आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकत्र काम करणार आहेत.