पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Maharashtra Assembly Election Results 2024) स्पष्ट बहुमत मिळालं असून 200 हून अधिक जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. अशातच पुणे शहरात 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचा विजयी झाला आहे. तर शहरातील वडगाव शेरी मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जवळपास 16 हजार चा लीड तोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare has won in vadgaon sheri) हे विजयी झाले आहे.
अटीतटीच्या लढतीत मारली बाजी : विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे हे पोर्श कार प्रकरणात चर्चेत होते. यानंतर निवडणुकीच्या काळात देखील सातत्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. विधानसभा निवडणुकीत हाच मुद्दा घेत त्यांच्याविरोधात प्रचार करण्यात आला. तर आज झालेल्या निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरी पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे हे आघाडीवर होते. मात्र, अखेर बापूसाहेब पठारे हे जवळपास 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.