पुणे : सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी याद्या जाहीर करण्याचा सपाटा लावलाय. गुरुवारी (24 ऑक्टोबर) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पहिली उमेदवार यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. बारामती मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. येथून शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळं बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
45 उमेदवारांची यादी जाहीर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली. ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचं पाटील म्हणाले. इस्लामपूरमधून जयंत पाटील, काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख, घनसावंगीमधून राजेश टोपे, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना : बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा सामना अजित पवारांसोबत होईल. अहेरीतून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा सामना त्यांचे वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत होईल. पारनेरमधून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली. त्या विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत. एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. कागलमधून समरजीत घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यांचा सामना हसन मुश्रीफ यांच्यासोबत होईल. दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना तासगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या यादीतील उमेदवार :
जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर