महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या पक्षापेक्षा कमी मते मिळूनही जागा जास्त; नेमका गोंधळ काय? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार विजयी झाले असले तरी हा पक्ष 58 लाख 16 हजार 566 मते मिळवून मततालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.

maharashtra assembly election 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 7:16 PM IST

Updated : Nov 28, 2024, 8:05 PM IST

मुंबई :विधानसभेच्या अभूतपूर्व निकालात भाजपा राज्यात सर्वात जास्त मते मिळवून राज्यातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनलाय. भाजपाला एकूण मतदानाच्या 26.77 टक्के मते मिळाली आणि त्यांचे 132 उमेदवार निवडून आलेत. भाजपाला 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मते मिळाली. भाजपा खालोखाल काँग्रेसला द्वितीय क्रमांकाची 12.42 टक्के म्हणजे 80 लाख 20 हजार 921 मते मिळाली, मात्र काँग्रेसचे अवघे 16 उमेदवार विजयी झालेत.

केवळ 10 उमेदवारांना विजय मिळवता आलाय : तृतीय क्रमांकाची 12.38 टक्के मते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाली. त्यांना 79 लाख 96 हजार 930 मते मिळाली. त्यांचे 57 उमेदवार विजयी झाले. 11.28 टक्के मते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालीय, त्यांना 72 लाख 87 हजार 797 मते मिळाली. मात्र त्यांच्या केवळ 10 उमेदवारांना विजय मिळवता आलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 9.96 टक्के मते मिळालीय. 64 लाख 33 हजार 13 मते मिळवून त्यांचे 20 उमेदवार विजयी झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9.01 टक्के मते मिळाली. त्यांना 58 लाख 16 हजार 566 मते मिळाली, मात्र त्यांचे 41 उमेदवार विजयी झालेत.

नोटाला 0.72 टक्के म्हणजेच 4 लाख 61 हजार 886 मते : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघी 1.55 टक्के म्हणजे 10 लाख 02 हजार 557 मते मिळालीत, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. नोटाला 0.72 टक्के म्हणजेच 4 लाख 61 हजार 886 मते मिळालीत. 'माकप'ला ०.३४ टक्के म्हणजे २ लाख २२ हजार २७७ मतं मिळाली व त्यांचा एक उमेदवार विजयी झाला. तर, 'बसपा'ला ०.४८ टक्के म्हणजे ३ लाख ११ हजार ७८१ मतं मिळाली, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

राजकीय पक्ष मतांची टक्केवारी मिळालेली मते विजयी उमेदवार
भाजपा 26.77 1,72,93,650 132
काँग्रेस 12.42 80,20,921 16
शिवसेना 12.38 79,96,930 57
राष्ट्रवादी श.प. 11.28 72,87,797 10
शिवसेना उ.बा.ठा. 09.96 64,33,013 20
राष्ट्रवादी काँग्रेस 09.01 58,16,566 41
समाजवादी पार्टी 0.38 2,47,350 02
एमआयएम 0.85 5,50,902 01
मनसे 01.55 10,02,557 0
नोटा 0.72 4,61,886 -
इतर 13.82 89,27,705 8

हेही वाचा :

  1. सुधांशू त्रिवेदी खरी माहिती असल्याशिवाय आरोप करत नाहीत, विनोद तावडेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
  2. "भाजपाचा खेळ खल्लास, भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला", विरोधकांनी विनोद तावडेंना घेरलं, अटकेची केली मागणी
Last Updated : Nov 28, 2024, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details