महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पोलिसांवर हल्लाबोल - Vijay Wadettiwar On Pune Police

Vijay Wadettiwar On Pune Police : पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच असल्याचं उघड झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांवर आरोप करत याबाबत खुलासा करण्याचं स्पष्ट केलं.

Vijay Wadettiwar On Pune Police
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 2:18 PM IST

Updated : May 29, 2024, 3:37 PM IST

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पोलिसांवर हल्लाबोल (ETV Bharat)

पुणे Vijay Wadettiwar On Pune Police :पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या आढळून आल्यानं पुणे पोलीस आयुक्तालयात चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळून आल्यानं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करत या धक्कादायक व्हिडिओची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी. पोलीस आयुक्तालय आवारात नेमकं चाललंय तरी काय, याबाबत पूर्ण खुलासा पुणेकरांसमोर मांडावा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं ट्विट (ETV Desk)

पुणे प्रकरणाकडं देशाचं लक्ष :पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणाकडं राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. यातच आता पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालय आवारातच या दारुच्या बाटल्यांचा खच सापडल्यानं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकं पोलीस आयुक्त कार्यालयात चाललंय काय हा प्रश्न आता उपस्थित केला जातं आहे.

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल :याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत म्हटलं आहे की, "पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्या कशा ? पुणे पोलीस आयुक्तालयात ऑन ड्युटी दारूचं सेवन केलं जातं का ? पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्यांचा खच असलेला व्हिडिओ समोर आला. पुणे पोलीस आयुक्तालय आवारातच या दारुच्या बाटल्यांचा खच सापडल्यानं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या धक्कादायक व्हिडिओची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी. पोलीस आयुक्तालय आवारात नेमकं चाललंय तरी काय, याबाबत पूर्ण खुलासा पुणेकरांसमोर मांडावा, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धंगेकर आणि अंधारे यांचा मोर्चा; कार्यालयातच वाचून दाखवली हप्तेखोरीची यादी - Ravindra Dhangekar News
  2. पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case
  3. डॉक्टर, पोलिसानंतर आता बालहक्क न्याय मंडळातील सदस्यही चौकशीच्या फेऱ्यात, काय आहे कारण? - Pune car accident case
Last Updated : May 29, 2024, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details