महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पेपर फुटीत सरकारच्या सहभागाची आम्हाला शंका': अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

Ambadas Danve On Government : "राज्यात पेपर फुटीची अनेक प्रकरणं पुढं आली आहेत. या पेपर फुटीत सरकारचा सहभाग असल्याची शंका आम्हाला येत आहे," असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

Ambadas Danve On Government
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 4:43 PM IST

मुंबई Ambadas Danve On Government : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज सलग चौथ्या दिवशी विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या प्रश्नाकडं सरकारचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे या सरकारचं करायचं काय... खाली डोकं वर पाय... अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. तसंच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, पेपर फुटीचे प्रकार आणि महिला अत्याचार हे वाढत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पेपर फुटीत सरकारच्या सहभागाची आम्हाला शंका असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

पेपर फुटीमध्ये सरकारचा सहभाग :"राज्यात मागील काही दिवसांपासून पेपर फुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळं जे हुशार विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. पण याला जबाबदार सरकार आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर केली. तसंच पेपर फुटून परीक्षा देणं आणि नोकरी मिळवणं असं घडवून आणण्याची राज्यात एक गँग आणि साखळी सुरू आहे. परंतु सरकारचा याच्यावर कुठेही वचक राहिलेला नाही. कधी कधी आम्हाला वाटतं या पेपर फुटीमध्ये सरकारमधील मंत्री आणि सरकार सहभागी आहे की काय? अशी आम्हाला शंका येत आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये पेपर फुटीच्या प्रकारानंतर तिथं परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि नव्यानं परीक्षा घेण्यात आल्या. मात्र महाराष्ट्रात तसं काहीही होत नाही. त्यामुळे पेपर फुटीमध्ये राज्यातील मंत्री आणि सरकारच असल्याची आम्हाला शंका आहे," अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी सरकारवर केली.

48 बाकी पैकी 85 जागा त्यांचा येणार :पुढं बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात सर्व घटकांना मदत करण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे. घोटाळा, भ्रष्टाचार होत आहे. रस्ते घोटाळा तसेच टेंडर काढले जात आहेत. कंत्राटदाराच्या भल्यासाठीच हे सरकार आहे. तसंच, लोकसभा निवडणुकीत 40 पारचा नारा भाजपानं दिला आहे. परंतु मला वाटतं 48 पैकी 85 जागा महायुतीच्या जिंकून येतील, असा उपरोधिक टोला अंबादास दानवे यांनी भाजपाला लगावला.

हेही वाचा :

  1. "सरकार विशेष अधिवेशन बोलावून वेळकाढूपणा करतंय", विरोधकांची सडकून टीका
  2. 'अकेला देवेंद्र कुछ भी नही कर सकता'; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details