नाशिक MP Equation Maharashtra :यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेलं होतं. या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बसला असं खुद्द भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही बोलून दाखवलं; मात्र असं असलं तरी राज्यातील 48 जागांपैकी 26 जागांवर मराठा समाजाचे नवे खासदार निवडून आले आले आहेत. त्या पाठोपाठ ओबीसी समाजाचे 9 खासदार, अनुसूचित जातीचे 6 खासदार असून अनुसूचित जमातीचे 4 नवे खासदार आहेत. अशात वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत.
लोकांनी स्वत:हून निवडणूक हातात घेतली : राज्य सरकार मराठ्यांना भित नव्हते. या निवडणुकीत मराठा समाजाने एकवटून दाखवून दिले. आता तरी सरकारने जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. निवडणुकीत मी कोणालाही पाडा म्हटलो नव्हतो. लोकांनी स्वतः हून ही निवडणूक हातात घेतली होती, असा दावा मनोज जरांगे पाटील त्यांनी केला आहे.
मराठा समाजाचे खासदार कोण ?
1) श्रीकांत शिंदे 2) स्मिता वाघ 3) शाहू छत्रपती 4) नारायण राणे 5) डॉ. शोभा बच्छाव 6) विशाल पाटील 7) उदयनराजे भोसले 8) नरेश मस्के 9) सुप्रिया सुळे 10)श्रीरंग बारणे 11) मुरलीधर मोहोळ 12) धैर्यशील मोहिते 13) संजय देशमुख 14) प्रतापराव जाधव 15) अरविंद सावंत 16) ओमप्रकाशराजे निंबाळकर 17) राजाभाऊ वाजे 18) निलेश लंके 19) संदीपाण भुमरे 20) डॉ. कल्याण काळे 21) बजरंग सोनवणे 22) अनुप धोत्रे 23) नागेश अष्टीकर 24) संजय जाधव 25) वसंत चव्हाण 26) धैर्यशील माने
ओबीसी खासदार :
1) डॉ. अमोल कोल्हे 2) रक्षा खडसे 3) प्रतिभा धानोरकर 4) सुनील तटकरे 5) डॉ. प्रशांत पडोळे 6) अमर काळे 7) संजय दिना पाटील 8) सुरेश बाळूमामा म्हात्रे 9) रवींद्र वायकर