महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली इथ संजयकाका पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर मोठा हल्लाबोल केला. माणूस हा जातीनं मोठा नसतो, तर गुणांनी मोठा असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Lok Sabha Election 2024
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 9:10 AM IST

Updated : May 6, 2024, 2:33 PM IST

माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं (Reporter)

सांगली Lok Sabha Election 2024 : माणूस हा जातीनं मोठा नसतो, तर गुणांनी मोठा असतो. त्यामुळे जात, पात, धर्म या आधारावर आम्हाला कोणतेही भेदभाव मान्य नाहीत, असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. 'जो करेगा जाती की बात, उसको पडेगी कस के लाथ,' अश्या शब्दात जातीचं राजकारण करणाऱ्यांना नितीन गडकरींनी फटकारलं आहे. ते सांगलीच्या जतमध्ये भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

Lok Sabha Election 2024 (Reporter)

जो करेगा जात की बात, उसको पडेंगे कस के लाथ :यावेळी बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, काँग्रेसनं या देशात जातीवादाचं राजकारण केलं. मात्र आता "जो करेगा जात की बात, उसको पडेंगे कस के लाथ," हे बोलण्याची माझ्यात ताकद आहे. मला सगळ्या समाजाची मत मिळतात, मी निवडून येणार आहे. तसेच माणूस हा जातीनं मोठा नसतो, गुणांनी मोठा असतो."

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं सेक्युलर राजे :या जगात, "देशात खऱ्या अर्थानं सेक्युलर राजा कोण असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही जगत आहोत. माझ्या दिल्ली आणि नागपूरच्या घरात आई-वडिलांचे फोटो नाहीत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, हा आमचा आदर्श आहे. जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे. या देशाचं भविष्य घडवायचं आहे. केवळ राजकारणामध्ये खासदार, आमदार बनायला नाही आलो, मी कधी कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. मी 40-50 वर्षे झालो मंत्री आहे, पण माझ्या स्वागताला कोणी कुत्रंही येत नव्हतं. मात्र आता कुत्रंही यायला लागलय. कारण मी झेड प्लस कॅटगरीमध्ये आलोय. त्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रं चक्कर मारून जाते," अशी फटकेबाजी नितीन गडकरी यांनी केली.

जॉर्ज फर्नाडिस आहेत आयकॉन :मी जॉर्ज फर्नाडिस यांना आपला आयकॉन मानतो. जात, पात, धर्माच्या आधारवर आम्हाला कोणतेही भेदभाव मान्य नाहीत. सामाजिक, आर्थिक, विषमता दूर करून गरीबी, भूकबळी, बेरोजगारी दूर करून, हाताला काम देऊन, जगातील तगडी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे, या देशाचं भविष्य घडवायचं आहे. राजकारणात निवडणुका लढवायच्या आहेत, म्हणून आम्ही आलो नाही. आम्हाला कोणावर टीका करायची नाही, आमची कामंच खूप मोठी आहेत. 'ये पब्लिक है, सब जाणती है,' त्याला सगळं माहिती असते. पण कोणत्याही भानगडीत पडू नका, अपक्ष उमेदवाराला निवडून आणू नका, कारण देशात आणि राज्यात जर वेगवेगळे सरकार असले, तर अपक्ष "ना घर का, ना घाट का"असतो," अशी टीका काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांवर नितीन गडकरी यांनी केली.

हेही वाचा :

  1. नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, कोण कुणाशी कधी लग्न करतं अन्... - Lok Sabha Election 2024
  2. यवतमाळच्या पुसदमध्ये नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ - Nitin Gadkari faints
  3. नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी; शाळा प्रशासनावर कारवाईचे आदेश, 'या' काँग्रेस नेत्यानं केली होती तक्रार - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 6, 2024, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details