महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदार जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाचा अनोखा फंडा, घेण्यात येणार 'या' स्पर्धा

लोकसभेची आचारसंहिता थोड्याच दिवसात लागेल, अशी परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे. मतदान मतदार जनजागृतीसाठी रिल्सची स्पर्धा घेतली जाणार आहे.

मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता मोहपात्रा
मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता मोहपात्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 10:42 PM IST

अमरावती :लोकसभा निवडणुकीसाठी आता कुठल्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे. या तयारीचाच भाग म्हणून मतदानाकरिता मतदार जागृतीसाठी विविध मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवल्या जाणार आहेत. या मोहिमेचाच एक भाग म्हणून फेसबुक आणि व्हाट्सअपद्वारे मतदार जागृती संदर्भात रिल्सची स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेसह मतदार जागृती संदर्भात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी माहिती जाहीर केली आहे.

अशी असणार रिल्स स्पर्धा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीने मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून खास रिल्स तयार केल्या जाणार आहेत. तरुणांसह सर्वच वयोगटातील पुरुष महिला रील्स मोठ्या आवडीने पाहतात. मतदानासाठी मतदारांना जागृत करणाऱ्या विषयावरील रिल्स मोठ्या संख्येने तयार व्हाव्यात आणि त्या सर्वांनी बघाव्यात, हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये रिल्सची स्पर्धा घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगानं उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा असा विषय या रिल्ससाठी ठरवून दिला आहे. उत्कृष्ट रिलीज बनवणाऱ्यांना बक्षीसदेखील दिले जाणार असल्याचं संजीता मोहपात्रा यांनी स्पष्ट केलं.

19 हजार 262 युवक पहिल्यांदाच करणार मतदान :अमरावती लोकसभा मतदारसंघात 24 लाख 3 हजार 78 मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये बारा लाख 33 हजार 378 पुरुष मतदार असून 11 लाख 59157 महिला मतदार आहेत. या सर्व मतदारांमध्ये 18 ते 19 या वयोगटातील एकूण 19 हजार 262 तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. रिल्सच्या माध्यमातून या तरुणांनादेखील मतदानासाठी प्रेरित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं केली जात आहे.

स्वाक्षरी अभियान ही राबवणार :मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यासाठी अमरावती शहरातील मुख्य चौकांसह मतदार संघातील सर्व तालुके आणि अनेक गावांमध्ये स्वाक्षरी अभियान राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी आज स्वतः मतदार जनजागृती स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेला सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details