महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024: कोल्हापुरात मातब्बरांची लढत; छत्रपती घराण्यासह महाडिक कुटुंबानं बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर मतदार संघात आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी छत्रपती शाहू महाराज यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी जोरदार टक्कर दिली आहे. इथं मतदान शांततेत सुरू आहे.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 2:28 PM IST

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या राज घराण्यातील सदस्यांनी नवीन राजवाडा परिसरातील महापालिकेच्या शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनीही मतदान केलं. "मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, यासाठी मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदान करावं," असं आवाहन यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी केलं.

छत्रपती शाहू महाराज (Reporter)

2 हजार 156 मतदान केंद्रावर मतदानाला शांततेत सुरुवात :कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 7 वाजल्यापासून जिल्ह्यातील 2 हजार 156 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी केली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी 8.05 टक्के मतदान झाले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 7.55 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. अत्यंत चुरशीनं झालेल्या प्रचारात महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराज तर महायुतीकडून संजय मंडलिक यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

संभाजीराजे छत्रपती (Reporter)

हातकणंगले मतदारसंघात बहुरंगी लढत :हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यंदा बहुरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर तर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, तिसऱ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नऊ वाजेपर्यंत सरासरी 7.55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला. भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक सहकुटुंब रुईकर कॉलनीतील मतदान केंद्रावर मतदान केलं. यावेळी अरुंधती महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक उपस्थित होते.

Lok Sabha Election 2024 (Reporter)

उन्हाचा तडाका आणि सकाळी लागल्या रांगा :कोल्हापूर जिल्ह्यात 40 डिग्रीपेक्षाही अधिक तापमान असल्यानं सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी सकाळी लवकरच मतदान करण्याला प्राधान्य दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदारांनी रांगा लावून मतदान केले. जिल्हा प्रशासनाकडून अनेक ठिकाणी आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली.

Lok Sabha Election 2024 (Reporter)

हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 (Reporter)
  1. तिसरा टप्पा निवडणूक : मोदी की गादी, नणंद की भावजय; मंगळवारी 'या' दिग्गजांमध्ये रंगणार सामना - Lok Sabha Elections 2024
  2. मतदाराला शिवीगाळ केल्याचा आमदार दत्ता भरणे यांच्यावर आरोप, रोहित पवार यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार - Lok Sabah Election 2024
  3. बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुनेत्रा पवार यांची बॅटिंग, पाहा व्हिडिओ - Sunetra Pawar Cricket video

ABOUT THE AUTHOR

...view details