महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नीट'घोटाळा प्रकरण; लातूर पोलीस धडकले उत्तराखंडमध्ये, कोनगुलवार कुटुंबीयांसह फरार - NEET Paper Leak Case - NEET PAPER LEAK CASE

NEET Paper Leak Case : लातूर जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना NEET पेपर लिक प्रकरणात अटक करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणाची पाळंमुळं इतर राज्यात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. लातूर पोलीस आरोपींच्या शोधात उत्तराखंड इथं धडकली आहेत. तर मुख्य आरोपी इराणा कोनगुलवार हा पत्नीसह फरार झाला आहे.

NEET Paper Leak Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 8:22 AM IST

लातूर NEET Paper Leak Case : नीट घोटाळ्यात लातूरच्या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना अटक केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार इराणा मष्णाजी कोनगुलवार हा पत्नीसह फरार झाला आहे. इराणा कोनगुलवार हा उमरग्याच्या आयटीआयचा सुपरवायझर आहे. दरम्यान नीट घोटाळ्याचा तपास करण्यासाठी लातूर पोलीस उत्तराखंडमध्ये धडकले आहेत. पोलीस उत्तराखंडमध्ये या प्रकरणाची झाडाझडती घेत असल्यानं या प्रकरणाची पाळंमुळं देशपातळीवर पसरली आहेत.

मुख्य सूत्रधार पत्नीसह फरार :नाट घोटाळ्यात इराणा मष्णाजी कोनगुलवार हा मुख्य सूत्रधार असून तो पत्नीसह फरार झाला आहे. पोलीस त्याच्या उमरग्यातील घरासह धाराशिव जिल्ह्यात शोध घेत आहेत. त्याच्या मागावर पोलिसांचं पथक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी लातूर पोलीस उत्तराखंडमध्येही धडकले आहेत. पोलीस नीट प्रकरणाची पाळमुळं शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत.

कोणगुलवार दिल्लीतील मुख्य सूत्रधाराला पाठवायचा पैसे :नांदेडच्या 'एटीएस'नं पहिल्या दिवशी इराणा मष्णाजी कोनगुलवार याची चौकशी करून त्याला सोडून दिले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. दुसरीकडं संजय जाधव आणि जलील पठाण मार्फत मिळणारे पैसे कोनगुलवार दिल्लीतील मुख्य सूत्रधार गंगाधर याला पाठवायचा. नांदेड एटीएस आणि लातूर पोलिसांची पथकं दिल्लीला पोहोचले, पण हे रॅकेट उघड झाल्याचं समजल्यानं गंगाधर दिल्लीतून गायब झाला. गंगाधरनं 24 तासात 300 किमी पेक्षा अधिकचं अंतर कापत सतत जागा बदलत असल्याचं तांत्रिक कारणावरुन कळाल्याचं खात्रीशीर सूत्रांकडून समजलं आहे.

नीट घोटाळ्याचं उत्तराखंड कनेक्शन :गंगाधर देहराडून इथं असल्याची प्राथमिक माहिती लातूर पोलिसांना खबऱ्यानं दिली. पण पोलीस त्याच्याककडं जात असल्याचं समजताच गंगाधरनं त्याचं लोकेशन बदलल्याचं सूत्रांनी सांगितलं. धाराशिवच्या कोनगुलवारकडून मिळणारी रक्कम गंगाधर दिल्लीतून उत्तराखंडच्या देहराडून इथल्या एका व्यक्तीकडं पाठवत असल्याचं पोलिसांना चौकशीत समजलं आहे. ही माहिती समजताच लातूरच्या गुन्हे शाखेचं एक पथक देहराडून इथं दाखल झालं. पण गंगाधर पथकाच्या हाती लागला नाही. गंगाधर सतत लोकेशन बदलत असल्यानं पथकानं त्याचा शोध सुरू ठेवला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. NEET पेपर लीकचा 6 राज्यांशी संबंध, सीबीआयची कारवाई, कोण आहे मास्टरमाइंड? जाणून घ्या A टू Z माहिती - NEET Paper Leak Connection
  2. NEET पेपर लिक प्रकरण; मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी, तर शिक्षकाला ठोकल्या बेड्या, NEET प्रकरणात लातूर कनेक्शन - NEET Exam Paper Leak Case
  3. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एसआयटी चौकशी होणार - NEET Paper Leak Case

ABOUT THE AUTHOR

...view details