बीड Zilla Parishad School Koregavhan:जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळा शिक्षण विभागानं बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा लाख लोक ऊसतोडणी कामगार म्हणून जिल्ह्याबाहेर ऊस तोडण्यासाठी जातात. ऊसतोड कामगार आपल्या पाल्यांनाही सोबत घेतात. त्यामुळं त्यांच्या मुलांचं शिक्षण कायमचं बंद होतं.
गावकऱ्यांसह शिक्षकाची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter) कारेगव्हाण शाळेचं पुनरुज्जीवन :विद्यार्थी नसल्यामुळंजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते. पर्यायानं त्या ठिकाणची शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर येते. मात्र, गावातील शाळा बंद होवू, नये यासाठी बीडमधील कारेगव्हाण गावातील नागरिकांसह शिक्षकांनी शाळेचं पुनरुज्जीवन केलंय. त्यामुळं गावातील ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गावातच सुविधा उपलब्ध झालीय. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं असून आमच्या मुलांना गावात चांगलं शिक्षण मिळत असल्याची प्रतिक्रिया इटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
गावातील शाळेबाबत लोक समाधानी : "गावातील शाळा चांगली नव्हती, शिक्षक चांगले नव्हते. त्यामुळं मुलं हुशार नव्हती. आम्ही मुलांना बाहेर गावी शिक्षणासाठी पाठवलं होतं. मात्र, आता गावातच चांगली शाळा झाल्यामुळं मुलांवर होणारा खर्च वाचलाय. त्यामुळं आता आम्ही समाधानी आहोत. शासनातर्फे ऊसतोड मजुरांसाठी चालवलेलं वसतीगृहही याच ठिकाणी सुरू आहे. मुलांच्या जेवणाची, शिक्षणाचीही व्यवस्था केली जातेय. त्यामुळं आम्हाला कोणतीही चिंता नसून आम्ही समाधानी आहोत", असं पालक रेखाल आंधाळे यांनी म्हटलं आहे.
शाळेचा खर्च वाचला :"आता आमच्या गावची शाळा चांगली आहे, म्हणून आम्ही मुलांना या शाळेत पाठवलं आहे. आम्हाला ऊस तोडायला जायचंय म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार करून गावातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातील जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू झाली. ज्या मुलांना गावाबाहेर शाळेत पाठवलं आहे, ती परत गावाकडं येत आहेत. ऊस तोडणीसाठी आम्हाला सहा महिने बाहेर जावं लागतं. त्यामुळं आम्ही मुलांवर पैसेही खर्च करत होतो, पण आता गावात शाळा असल्यानं आमचा खर्चही वाचला आहे. मी देखील या शाळेत शिकलो आहे. त्यामुळं आमची शाळा चांगली असल्याचं माला समाधान आहे", अशी प्रतिक्रिया महादेव खंडारे यांनी दिली आहे.
"मी या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेतलंय. या ठिकाणी एक शाळा होती, ती चांगली नव्हती. येथील शिक्षक देखील चांगले शिकवत नव्हते. तसंच संपूर्ण शाळा जीर्ण झाली होती. शाळेच्या आजूबाजूलाही अतिक्रमण झालं होतं. मात्र आता अतिक्रमण हटवलं असून वर्गही सुरू झाले आहेत. त्यामुळे पालकांचाही आत्मविश्वास वाढला आहे. मुलाचा वर्षाकाठी होणारा वीस ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च आम्ही वाचवला आहे. आम्ही आमच्या गावात राहून गावातच मोफत शिक्षण घेतोय. आम्ही सर्व ग्रामस्थांनी आमच्या गावात पहिली ते दहावीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे". - बालाजी खंदारे, नागरिक
गावात 90% ऊसतोड कामगार :कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेची स्थापना 1959 मध्ये झाली होती. पहिली ते चौथीपर्यंत गावातंच शिक्षण मिळत होतं. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेकनूरला जाव लागत होतं. या गावात 90% ऊसतोड कामगार आहेत. त्यामुळं त्यांच्या मुलांच्या शिक्षणांचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, आता गावात चांगली शाळा नसल्यानं सोलापूर, सातारा, बीड, अहमदनगरमध्ये लोक आपल्या मुलांना पाठवायचे. मात्र आता गावातीलच शाळा चांगली झाल्यानं ते आपल्या पाल्यांना कारेगव्हाण शाळेत पाठवताय. सर्व ग्रामस्थांनी घेतललेल्या निर्णयामुळं तसंच शिक्षकांच्या सहकार्यानं गावातील शाळेचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळं पटसंख्येत देखील वाढ झाली आहे, अशी माहिती कारेगव्हाणचे सरपंच सदाशिव खंदारे यांनी दिली आहे.
विद्यार्थी पटसंख्येत वाढ :कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या गतवर्षी 78 टक्के होती. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून पाच लाख रुपये जमा केले. सर्व खर्च गावकऱ्यांसमोर मांडल्यानंतर शाळेबाबत निर्णय घेण्यात आला. आम्ही चांगलं काम केलं असून, आज या शाळेत 150 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेनं तालुकास्तरावर माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारही पटकावला आहे. तालुक्यातील सर्वात खालच्या स्तरावरील शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेत पाठवल्यानं विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली असून, विद्यार्थी, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, असं मुख्यध्यापक विकास परदेशी म्हणाले.