महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदाराकडून ममता बॅनर्जींच्या पुतण्याच्या घराची रेकी; कोलकाता पोलिसांनी केली अटक - Kolkata Police Arrested Mumbai Man - KOLKATA POLICE ARRESTED MUMBAI MAN

Kolkata Police Arrested Mumbai Man : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदार राजाराम रेगे याला कोलकाता पोलिसांनी अटक केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुतण्याच्या घराची रेकी केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Kolkata Police Arrested Mumbai Man
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 10:00 AM IST

मुंबई Kolkata Police Arrested Mumbai Man : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नातेवाईक अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली केली आहे. कोलकाता पोलिसांनी मुंबईतील माहीम पश्चिम येथून मुंबई पोलिसांच्या मदतीनं संशयित आरोपी राजाराम रेगे याला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी "माहीम पश्चिम येथून राजाराम रेगे याला कोलकाता पोलिसांनी सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलं," असं सांगितलं. राजाराम रेगे हा शिवसेना भवनमध्ये कार्यरत होता, त्यासह तो भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राजाराम रेगे

रेकीमध्ये राजाराम रेगेचा सहभाग :राजाराम रेगे हा संगणकाचा व्यवसाय करत असून माहीम इथं राहतो. अभिषेक बॅनर्जी यांच्या घराच्या आणि कार्यालयाच्या रेकीमध्ये राजाराम रेगेचा सहभाग असल्याचं आढळून आलं. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी रेगेला अटक केली आहे. कोलकाता पोलीस आता राजाराम रेगेंची कसून चौकशी करत आहेत.

डेव्हिड कोलमन हेडलीच्या संपर्कात :राजाराम रेगे याची 26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याच्यासोबत 2008 मध्ये भेट झाली. दादरमधील शिवसेना भवन इथं दोघं भेटले, अशी माहिती मिळाल्यानंतर राजाराम रेगे याची चौकशी करून 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात याला साक्षीदार बनवले होते. त्यावेळी राजाराम रेगे काही काळासाठी भारतीय विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होता. रेगे आणि हेडली यांच्यात व्यावसायिक संबंध निर्माण होणार होते. रेगेनं हेडली समोर भागीदारीसाठी प्रस्ताव देखील ठेवला होता. 2010 मध्ये रेगे याची एन आय एनं चौकशी देखील केली होती. रेगे यानं NIA ला पूर्ण सहकार्य केलं होतं.

लष्कर ए तोयबाला करायचा होता हल्ला :"लष्कर ए तोयबाला भविष्यात सेना भवन या इमारतीवर हल्ला करायचा असल्यानं मला शिवसेना भवनात प्रवेश करायचा होता. शिवसेना भवनाचा व्हिडिओ काढला आणि तो लष्कर ए तोयबाला दिला. ते भविष्यात शिवसेना मुख्यालय आणि बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा विचार करत होते," अशी माहिती डेव्हिड हेडलीनं ऑनलाईन चौकशीत दिली. साजिद मीर यानं डेव्हिड हेडलीला राजाराम रेगे याच्याशी मैत्री करण्यास सांगितलं. त्यावेळी राजाराम रेगे सेना भवनमध्ये काम करत होता. मात्र, डेव्हिड हेडली बरोबर संपर्कात असल्याचं कळताच सेना भवनमधून रेगे याची हकालपट्टी करण्यात आली.

हेही वाचा :

  1. ‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी
  2. Mumbai 26/11 Attack : 'आरोपी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हे भारतासाठी मोठे यश'
  3. Mumbai Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण; तहव्वूर राणाविरोधात पोलिसांनी दाखल केलं आरोपपत्र

ABOUT THE AUTHOR

...view details